जीवनशैलीतील या गोष्टींमुळे स्मृती कमजोर होऊ शकते!

जीवनशैलीतील या गोष्टींमुळे स्मृती कमजोर होऊ शकते!

धावपळीच्या दिनचर्येत लोक अनेक कारणांनी त्रासलेले असतात. वेगवेगळे ताण सतावत असतात. या सगळ्यामुळे अनेकदा काही महत्त्वाच्या गोष्टी विसरल्या जातात. तर काही वेळा मुद्दे मांडताना काही क्षणात त्यांचा विसर पडतो. तुम्हालाही ही समस्या असेल तर याचा अर्थ तुमची स्मृती काहीशी कमजोर आहे किंवा झाली आहे.

●स्मृती कमजोर होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. अनेकदा गुंतागुंतीची जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या सवयी तर शरीरात पोषकघटकांची कमतरता या सगळ्यामुळे स्मृती कमजोर होऊ शकते.

●मेंदु तल्लख करण्यासाठी पोषकघटकांची गरज असते. त्यामुळे आहारातून पोषकतत्त्वे योग्य प्रमाणात मिळणे आवश्यक असते. यासाठी आहारात व्हिटॉमिन बी युक्त पदार्थांचा म्हणजे अंडे, मासे, डेअरी प्रॉडक्स यांचा समावेश करा.

●रोज चहा-कॉफी आणि ज्युस यामधील साखरही मेंदूला नुकसान पोहचवते. त्यामुळे साखरेचा वापर कमीत कमी करा. शक्य असल्यास साखरेऐवजी गुळ किंवा मधाचा वापर करा.

●तणाव कमी करण्यासाठी लोक धूम्रपान आणि मद्याचा आधार घेतात. मग त्याचे व्यसन लागते. तुमची ही परिस्थिती अशी असल्यास तुम्हाला सावधान होण्याची गरज आहे. कारण या गोष्टी तुमची स्मृती हळूहळू कमजोर करतात.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

📱Tech Knowledge : स्मार्टफोनमधील किरणोत्सर्गामुळे गर्भपाताचा धोका...