अशी बनवा घरच्या घरी उपवासाची जिलेबी

🌀 अशी बनवा घरच्या घरी उपवासाची जिलेबी

गोड पदार्थांच्या यादीत जिलेबीला मानाचे स्थान आहे. जिलेबी ही अशी मिठाई आहे जी कोणत्याही सणाला बनवली जाऊ शकते. मात्र त्यात मैदा असल्याने तुम्ही उपवासाच्या दिवशी जिलेबी खाऊ शकत नाही. मात्र उपवासादरम्यान जिलेबी खावीशी वाटत असेल तर तुम्ही घरच्या घरी अॅपल जिलेबी बनवू शकता. नेहमीच्या जिलेबीमध्ये थोडाचा उपवासाचा ट्विस्ट देऊन तुम्ही उपवासाची जिलेबी बनवू शकता. 

🍴साहित्य - सफरचंद, वऱ्याच्या तांदळाचे पीठ, शिंगाड्याचे पीठ, दही, तूप, दूध, साखरेचा पाक, पिस्ता.

🍴पाक बनवण्याची कृती - एका पॅनमध्ये साखर आणि पाणी घालून गरम करा. उकळल्यावर त्यात थोडे दूध टाका. आता हा पाक चाळणीने गाळून घ्या. मध्यम आचेवर ८ ते १० मिनिटे उकळवा. बोटांच्या सहाय्याने पाक तयार झाला की नाही हे तपासून घ्या. एक तारी पाक बनायला हवा. दोन तारी पाक बनवायचा असेल तर पाक आणखी दोन ते तीन मिनिटे उकळवा. यात तुम्ही वेलचीची पावडरही टाकू शकता. 

🍴अॅपल जिलेबी बनवण्याची कृती - अॅपल जिलेबी बनवण्यासाठी सर्वात आधी सफरचंद गोल कापून त्यातील बिया काढून घ्या. एका वाडग्यात वऱ्याच्या तांदळाचे पीठ, शिंगाड्याचे पीठ एकसमान प्रमाणात घ्या. यात २-३चमचे दही घाला आणि मिक्स करा. जिलेबी बनवण्याच्या दोन तास आधी हे मिश्रण तयार करुन ठेवा. तूप गरम करा. सफरचंदाचे काप या मिश्रणात घोळवून तळा. तळलेले सफरचंदाचे काप पाकात टाका. काही वेळाने पाकातून काढून डिशमध्ये ठेवा. त्यावर पिस्ता टाकून खायला द्या. 

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

📱Tech Knowledge : स्मार्टफोनमधील किरणोत्सर्गामुळे गर्भपाताचा धोका...