लठ्ठपणा कमी करण्यासाठी करा ‘हे’ आसन

लठ्ठपणा कमी करण्यासाठी करा ‘हे’ आसन

लठ्ठपणा कमी करणे ही एक मोठी समस्या बनली आहे. बैठी कार्यपद्धती, जंकफूडचे सेवन, अपुरी झोप आणि इतरही अनेक गोष्टींमुळे स्त्रिया आणि पुरुष यांच्यात लठ्ठपणा वाढत चालला आहे. मग ही वाढलेली चरबी कमी करण्यासाठी अनेक पर्यायांचा अवलंब केला जातो. कधी जिम लावणे तर कधी डाएट प्लॅन असे उपाय करुन ही चरबी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. मात्र तरीही चरबी घटण्याचे नाव घेत नसेल तर योगशास्त्राची मदत घेऊन बघा. योगासने हा पारंपरिक भारतीय व्यायाम असून त्यातील अनेक आसने ही विविध समस्यांवर उपयुक्त ठरतात.

जानुस्पर्शासन हे दंडस्थितीतील एक आसन आहे. त्याचा चरबी कमी करण्यासाठी चांगला उपयोग होतो. प्रथम दंडस्थिती घेऊन सरळ उभे रहावे. मग एका पायावर उभे राहून दुसरा पाय जमिनीला समांतर न्यावा. श्वास सोडत डोके जास्तीत जास्त या उभ्या केलेल्या पायाच्या गुडघ्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करावा. डोके गुडघ्याला लागले तर तुमचे शरीर लवचिक आहे असे समजावे. सुरुवातीला हा लवचिकपणा येत नाही. मात्र सरावाने तो येतो. डोके गुडघ्याला लावण्याच्या स्थितीत श्वास रोखावा. दोन्ही हातांनी जमिनीला समांतर असलेल्या पायाचे पाऊल पकडावे, नाकाने गुडघ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करावा. त्यावेळी कुंभक करावे.

शरीराची चरबी कमी होण्यास मदत तर होतेच आणि खाल्लेले अन्नही चांगले पचते. तसेच कुंभक स्थितीमुळे हृदयाला एक प्रकारचा व्यायाम होतो आणि श्वसन कार्य सुधारते. दमा असलेल्या व्यक्तींनी हे आसन जरूर करावे. या आसनात प्राणायामाचा चांगला अभ्यास होऊ शकतो. हे आसन नियमित केल्यास गुडघेदुखी थांबते. या आसनाने पोटऱ्यांनाही व्यायाम होतो. तसेच कंबर लवचिक होते आणि कंबरेला ताण बसल्यामुळे कंबरदुखी थांबते. एकदा डाव्या पायाने, एकदा उजव्या पायाने असे दोन्ही पायांनी जानुनासिकास्पर्शासन करता येते.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

📱Tech Knowledge : स्मार्टफोनमधील किरणोत्सर्गामुळे गर्भपाताचा धोका...