ЁЯТб рд╕्рдЯीрдлрди рд╣ॉрдХिंрдЧ рдпांрдЪे рдк्рд░ेрд░рдгाрджाрдпी рд╡िрдЪाрд░
💡 स्टीफन हॉकिंग यांचे प्रेरणादायी विचार
जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ प्रा. स्टीफन हॉकिंग बोलणारं एक-एक वाक्य हे प्रेरणादायी विचार म्हणून नोंदले गेले आहे. त्यापैकी काहींवर एक नजर टाकुयात...
▫ गंमती नसतील तर आयुष्य एक शोकांतिका ठरेल.
▫ जरी मी हालचाल करु शकत नसलो, मला बोलण्यासाठी कॉम्प्युटरची मदत घ्यावी लागत असली, तरीही मी माझ्या मनातून मुक्त आहे
▫ नेहमी आकाशातील ताऱ्यांकडे पहा, आपल्या पायाखाली पाहू नका. जे पाहाल, त्याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करा. कुतूहल जागरुक ठेवा.
▫ आयुष्य कितीही कठीण असलं तरी, त्यावर तुम्ही मात करु शकताच. तुम्ही यशस्वी व्हाल!
▫ आपल्याला जे-जे करता येईल ते सर्व करायला हवं. मात्र जे आपल्या हातात नाहीत, त्याबाबत पश्चाताप करु नये.
▫ दिव्यांगांना माझा सल्ला आहे, तुम्ही त्या गोष्टींवर लक्ष द्या, ज्या करण्यापासून तुम्हाला तुमचं अपंगत्व रोखू शकणार नाही, किंवा तुमचं अपंगत्व त्याआड येणार नाही. लक्षात ठेवा आत्मा आणि शरीर दोन्हीही अपंग होऊ देऊ नका.
▫ आक्रमकता मनुष्याची सर्वात वाईट सवय आहे. आक्रमकता सभ्यतेचा नाश करते.
▫ कधीही करु शकत नाही असं काहीही नाही.
▫ जे आपल्या बुद्ध्यांकाबद्दल/ IQ बद्दल दावा करतात, ते अयशस्वी असतात.
▫ ब्रह्माण्डापेक्षा मोठं आणि जुनं काहीच नाही.
Comments
Post a Comment