कळत नाही...

कळत नाही...

स्वच्छ पाण्याचा जसा तळ दिसत असला ना की,
पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही.
तसंच माणसाच्या बाबतीत असतं
त्याच्या मनाचा तळ समजला की,
त्याच्या सहवासाची भीती वाटत
नाही...आणि नातंही स्वच्छ वाटू लागतं...!!
"ओढ" म्हणजे काय ते,
"जीव" लावल्याशिवाय कळत नाही...
"प्रेम" म्हणजे काय ते,
"स्वतः केल्याशिवाय" कळत नाही...
"विरह" म्हणजे काय ते,
"प्रेमात" पडल्याशिवाय कळत नाही...
"जिंकण" म्हणजे काय ते,
"हरल्याशिवाय" कळत नाही...
"दुःख" म्हणजे काय ते,
"अपेक्षाभंग" झाल्याशिवाय कळत नाही...
"सुख" म्हणजे काय ते,
"दुसर्यांच्या हास्यात" शोधल्याशिवाय कळत नाही...
"समाधान" म्हणजे काय ते,
"आपल्यात शोधल्याशिवाय" कळत नाही...
"मैत्री" म्हणजे काय ते,
"जीव लावल्याशिवाय" कळत नाही...
"आपली माणस" कोण ते,
"संकटांशिवाय" कळत नाही...
"सत्य" म्हणजे काय ते,
"डोळे उघडल्याशिवाय" कळत नाही...
"उत्तर" म्हणजे काय ते,
"प्रश्न पडल्याशिवाय" कळत नाही...
"जबाबदारी" म्हणजे काय हे त्या,
"सांभाळल्याशिवाय" कळत नाही...
"काळ" म्हणजे काय हे तो,
"निसटून गेल्याशिवाय" कळत नाही...

स्वप्निल आव्हाड, माळवाडी. सिन्नर.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?