पंढरीची वारी...

पंढरीची वारी...

टाळ मृदुंग विणा खांद्यावरी,
विठू माऊलीचे नाम मुखावरी,
अशी चालते पंढरीची वारी
घेवूनीया तुळशी वृंदावन डोईवरी..

तुकोबाची पावले,
ज्ञानोबाची पालखी,
संताची सोबत घेवूनीया
वारकरी आनंदात चालती…

कधी येतो पाऊस,
कधी सतवतो वारा,
गावागावाच्या मुक्कामाला,
मंदिराचा असतो निवारा..

कोणी येतो भक्तीपोटी,
कोणी येतो नवसासाठी,
देव म्हणतो चालत रहा भक्ता
मी सदैव तुझ्याच पाठी..

ऐन वारीत चालती ,
भजने , भारूडे अन संतवाणी,
कोण म्हणतो तुच मायबाप
तर कोण म्हणतो नाही कोणी तुझ्यावानी…

ना इथे चालती भेदभाव,
आहो सार्‍यांचा इथे एकच गाव,
अश्या महराष्ट्राच्या संकृतीला
माझा नेहमीच सलाम…

प्रांताप्रांत्याच्या प्रत्येक वारकर्‍यांच्या भक्तीला,
माझा नतमस्तक होऊनी प्रणाम…

कवी:-________________
-@ स्वप्निल आव्हाड, माळवाडी. सिन्नर. @

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?