स्वप्न...

स्वप्न...

ती नेहमी म्हणायची स्वप्ने पाहू
नकोस !
स्वप्न परीचे पाहिले
की तिला सांगायचो,
परीचा राजकुमार मीच
अशा काही कल्पना करायचो,
स्वप्नात हि स्वप्ने रंगवत असाच
काही वागायाचो,
ती नेहमी म्हणायची स्वप्ने पाहू
नकोस !
मनातल्या भावना तिच्या कडे
व्यक्त करायचो,
उगवत्या सूर्या पासून ते
मावलत्या सूर्या पर्यंत
फक्त तिच्या गोष्टी करायचो,
रात्रीच्या चंद्रा कडे पाहुन
तिच्याच स्वप्नात डुबायचो,
ती नेहमी म्हणायची पण
ऐक्नार्यातला मी कोण...?
स्वप्ने पहाता-
पहाता इतका काही गुंतलो,
की पुन्हा वास्तव्यात येन स्वप्न
होउन राहिले,
मैत्री हि हरवली,
परी हि हरवली,
राहिला तर फक्त पचतावा....!
अस तुमच्या सोबत होउन देऊ नका
"होती एक परी
तिच्यावर खुप मी प्रेम करायचो
तिची आठवण आल्यावर
कविता करत बसायचो..
"वेडा होतो अगदी वेडा होऊन
जायचो....

कवि : _______
स्वप्निल आव्हाड, माळवाडी. सिन्नर.

Comments

Popular posts from this blog

लेख: आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.