Kitchen Recipes Katta

Kitchen Recipes Katta

👉 स्ट्रॉबेरी सरबत

साहित्य

एक किलो साखर I 400 मिली. पाणी I अर्धा चमचा सायट्रिक अ‍ॅसिड  I पाव चमचा स्ट्रॉबेरी रेड कलर I अर्धा चमचा स्ट्रॉबेरी इसेंस.

कृती

प्रथम एक किलो साखरेत 400 मिली. पाणी घाला. त्यात अर्धा चमचा सायट्रिक अ‍ॅसिड टाकून एकत्र करून गॅसवर एक उकळी येईपर्यंत ठेवा. थंड झाल्यानंतर रंग, इसेंस घाला व गाळून बाटलीत भरा. सरबत देताना पाव भाग तयार केलेले लिक्विड आणि पाऊण भाग पाणी किंवा दूध व एखादा बर्फाचा खडा टाका.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

👉 पनीर रसमलाई

साहित्य

एक लीटर दूध I चार वाट्या साखर I एक कंडेन्सड मिल्कचा डबा I दोन ते तीन कप सायीसकट दूध I चार-पाच वेलदोड्याची पूड I थोडी केशराची पूड I एक चमचा मैदा.

कृती

एक लीटर दूध पातेल्यात ठेवून उकळा. उकळी आली की त्यात अर्धा लिंबाचा रस व अर्धा चमचा तुरटीची पूड घालून दूध नासवा. दूध चांगले फाटले की उतरवा व गार झाले की कपड्यावर ओतून सैलसर पुरचुंडी बांधून टांगून ठेवा. पाणी गळायचे थांबले की काढून घ्या. परातीत हे नासलेले दूध व मैदा एकत्र करुन मळून घ्या. नंतर त्याचे सुपारीएवढे गोळे करा.

एका उथळ पातेल्यात दोन वाट्या साखरेत चार वाट्या पाणी घालून कच्चा पाक करा. पाकाला उकळी आली की त्यात गोळे सोडा. गोळे शिजले की चमचाने अलगद काढून घ्या व ताटलीत ठेवा, गार होऊ द्या. कंडेन्सड मिल्कमध्ये दूध घालून सारखे करा. वेलदोड्याची पूड व केशर घाला. नंतर या दुधात वरील गार झालेले गोळे सोडा.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

👉 क्रिस्पी भेंडी

साहित्य

मध्यम आकाराच्या 15 भेंड्या I 2 चमचे बेसन I 1 चमचे तांदूळ पीठ I अर्धाचमचा आले लसूण पेस्ट I 1 चमचा लाल तिखट I पाव चमचा हळद I पाव चमचा जिरेपूड I चवीपुरते मीठ I तळण्यासाठी तेल I चवीनुसार चाट मसाला.

कृती

प्रथम प्रत्येक भेंडीचे एकदम पातळ उभे काप काढावेत. एका छोट्या वाटीत बेसन, तांदूळ पिठ, लाल तिखट, हळद, जिरेपूड, थोडा चाट मसाला आणि चवीपुरते मिठ एकत्र करून व्यवस्थित मिक्स करावे. भेंडीचे पातळ काप एका वाडग्यात घ्यावेत आणि त्यात आले लसूण पेस्ट घालून चमच्याने ढवळावे. त्यात बेसन पीठाचे मिश्रण घालून हलक्या हाताने मिक्स करावे. हे मिश्रण 15 मिनिटे झाकून ठेवावे. त्यानंतर कढईत तेल गरम करावे. भेंडीचे मॅरीनेटेड पातळ काप तेलात सुटे करून सोडावेत. मिडीयम हाय गॅसवर कुरकूरीत होईस्तोवर तळावेत. शक्यतो एका वेळी 3 ते 4 भेंडी तळावीत. तळलेले भेंडी काप पेपर टॉवेलवर काढून घ्यावेत. यावर थोडे लिंबू पिळावे किंवा चाट मसाला घालावा. तिखटपणासाठी लाल तिखट भुरभुरावे.

Comments

Popular posts from this blog

लेख: आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.