फुलांचा असाही उपयोग...

🎯 फुलांचा असाही उपयोग...

सण-सभारंभ, सुगंध, हार, गजरा, अशा अनेक कारणासाठी फुलांचा उपयोग केला जातो. त्यामुळे प्रत्येकजणांना फुल प्रिय आहे. पण फुलांचा उपयोग फक्त अशा कारणांसाठीच होतो का? तर नाही. निसर्गाने जरी फुलांना सौंदर्य बहाल केले असले तरी त्यात अनेक औषधी गुणधर्म असतात. त्याचा उपयोग शारीरिक व्याधी दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो. म्हणून काही ठराविक फुलांचे औषधी गुणधर्म जाणून घेऊ...

🎯 गुलाब

👉 गुलाबाच्या नियमित सेवनाने चेहऱ्याचा रंग उजाळतो.

👉 हृदयाची धडधड कमी होऊन रक्त मूळव्याध व श्वेत प्रदर कमी होतो.

👉 गुलाब पाण्याने निद्रानाश, उन्माद, नेत्ररोग आणि मूत्रव्याधी कमी होतात.

👉 गुलकंदामुळे उन्हाळ्याचा त्रास कमी होतो.

🎯 जास्वंद

👉 जास्वंदाची फुले मलरोधक, केशवर्धक असतात.

👉 फुलांचा रस केसांना लावल्यास केसांचा पांढरेपणा कमी होतो.

👉 ही फुले तुपात तळून खाल्ली तर श्‍वेतप्रदर विकारात आराम होतो.

👉 फुलांचे पाणी घेतल्यास मळमळ, आम्लपित्त, वमन यापासून आराम मिळतो.

🎯 चाफा

👉 चाफ्याची फुले ज्वरहर, उत्तेजक, दाहनाशक आणि नेत्र ज्योतिवर्धक असतात.

👉 रक्तविकार आणि विषबाधेतसुद्धा यांचा लेप लाभदायक ठरतो.

🎯 कमळ

👉 कमळाच्या फुलाचे सरबत घेतल्याने चेहरा खुलतो.

👉 चेहर्‍यावरील यौवनपिटिका कमी होतात, त्वचा नितळ होते.

👉 तृष्णा, दाह व रक्तविकारात आराम होतो.

🎯 जुई

👉 जुईच्या फुलांचे चूर्ण किंवा गुलकंद आम्लपित्त व पोटाच्या अल्सरवर गुणकारी असते.

👉 जुई शीतल, पित्तनाशक, दंतरोग, नेत्ररोग निवारक असते.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?