अपयशातून न शिकणे हा गुन्हाच!

👉 अपयशातून न शिकणे हा गुन्हाच!

यश-अपयश हे जीवनातील अविभाज्य घटक. धावण्याची स्पर्धा असो किंवा जीवनातील स्पर्धा. सर्वांनाच पुढे जाण्याची घाई झालेली आहे. अशावेळी अचानक आलेले अपशय काहीजण पचवू शकत नाही. यशाची जीवघेणी स्पर्धा कधी-कधी आयुष्य संपवते. त्यामुळे यशाला आणि अपयशाला सर्वस्व न मानणे, चुकीचे ठरते. आजचा अयशस्वी विद्यार्थी यशस्वी ठरतो तर आजचा यशस्वी विद्यार्थी कदाचित उद्या उपयशी ठरु शकतो. कधी-कधी यशापेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक महत्वाचा असतो. हाच प्रयत्न यशाकडे नेणारा असतो.

अपयश शक्तशाली बनविते - एखाद्या व्यक्तीला कामात यश आले नाही कि त्याच्या वर्तनात किंवा विचारात बदल होतो. तो अधिक हताश आणि आत्मविश्‍वास गमावून बसतो. तर काही जण याच अपयशाला सकारात्मक दृष्टीकोनातून पाहतात. अपयश कशामुळे आले याचा अभ्यास करुन भविष्यात तशा चुका टाळतात आणि अपयशालाच टार्गेट करुन शक्तीशाली बनतात. दुसर्‍या प्रयत्नात हमखास यश मिळते. तुम्ही जर अपयशी ठरला तर तुमचे आत्मबल आणि आत्मविश्‍वास अधिक कणखर होण्यास मदत होते. परिस्थितीशी सामना करण्याचे धैर्य त्यांच्या अंगाशी येते. अपयशानंतर मिळालेले यश हे अलौकिक असते आणि मागचे अपयश धुवून टाकते.

अपयशातून अधिक शिक्षण : कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते. आजचा यशस्वी व्यक्ती हा आयुष्यात कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर अपयशी ठरलेला असतो. त्याने ते अपयश उराशी बाळगून राहण्यापेक्षा ते अपयश कसे दूर करता येईल. याचा विचार केल्याने तो पूढे निघून जातो. मात्र अपयशाच्या वेळी चुका समोर येतात आणि आपल्याला उणिवा जाणवायला लागतात. अपयशाला कारणीभूत ठरलेल्या प्रत्येक चुकांचे अवलोकन आणि अभ्यास करुन त्यांचे निराकरण केले पाहिजे. अपयशानंतर त्यावर वेळ घालवण्यापेक्षा यशासाठी नव्याने प्रयत्न करण्यासाठी वेळ द्यावा.

नवीन मार्ग शोधणे : अपयशामुळे यशाचा मार्ग थांबला असा विचार करणे, चुकीचे आहे. जेव्हा एक दरवाजा बंद होतो, तेव्हा दुसरे दरवाजे उघडले जातात, असे म्हटले जातात. गरज असते ती तो दरवाजा शोधण्याची. अपयशामुळे आपण अन्य मार्गाने, पद्धतीने त्यावर उपाय शोधण्यासाठी प्रवृत्त होतो. अन्य मार्गाने आपण यशाचे शिखर गाठू शकतो काय? याचा विचार केला पाहिजे. एकाच मार्गाला कवटाळून बसण्यापेक्षा नवनवीन मार्ग कसे सापडतील? याचा सातत्यपुर्ण विचार केला पाहिजे. असा मार्ग निवडा कि, जो तुम्हांला ध्येयापर्यंत नेऊ शकेल.

अपयशाला संधी मानणे : अपयशी होणे हा गुन्हा नाही. परंतू अपयशातून न शिकणे हा गुन्हा मानला जातो. अपयशी ठरल्यानंतर तुम्ही त्यातून कसे बाहेर पडता, याला महत्व आहे. अनेक मोठ-मोठ्या कंपन्यांचे मालक, नेते हे सुरुवातीच्या काळात अपयशीच ठरलेले आहेत. त्याचे अनेक दाखलेही देता येतील. परंतू त्यांनी अपयशाला संधी मानली आणि त्यातून शिकून टीमवर्कच्या माध्यमातून आपली कंपनी, आपला पक्ष गट पुढे नेला आणि यशस्वी केला आपल्या ध्येेयावर अपयशाचा कधीही परिणाम होऊ दिला नाही.

शेवटी सांगायचं एवढंच कि, तुम्हीही आयुष्यातील अपयशाला कवटाळून बसू नका. नवनीवन मार्ग सापडतील फक्त प्रयत्न करत रहा...

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?