इम्प्रेशन इम्प्रेसिव्ह होण्यासाठी...

👉 इम्प्रेशन इम्प्रेसिव्ह होण्यासाठी...

क्षेत्र कोणतंही असो आपलं इम्प्रेशन मॅटर करतचं. दैनंदिन जीवनात विविध कामानिमित्त कळत-नकळत आपल्या अनेकांशी ओळखी होत असतात. अशा भेटींमध्ये आपल्याबाबत विशिष्ट प्रकारची भूमिका समोरच्याच्या मनात तयार होत असते. जर ही भूमिका इम्प्रेसिव्ह असेल तर ठिक नसेल तर काय करावे याबद्दल जाणून घेऊयात...

1. उद्देश नक्की करा - आपले चांगले इम्प्रेशन बनवण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला उद्देश नक्की करणे आहे. हे सर्वात महत्वाचे तेव्हा असते जेव्हा आपण कुठल्याही मोठ्या बैठक, नेटवर्किंग कार्यक्रम किंवा मित्राच्या पार्टीमध्ये जात असतो. जेव्हा आपण तयार होत असतो जाण्यासाठी किंवा गाडी चालवत असताना हा विचार करायला हवा आपण कुठल्या व्यक्तीला भेटणार आहोत आपला संवाद कसा असायला हवा याचा विचार करा.

2. देह बोली छान ठेवा - देह बोली आपल्या फर्स्ट इम्प्रेशनचा एक महत्वाचा भाग असतो. आपण काय बोलतो? कसे बोलतो? कुठली बोली वापरतो बोलताना खूप महत्वाचे असते. यासाठी आपण स्वतःचे परीक्षण एक खोलीमध्ये स्वतःचा व्हिडिओ काढून त्याला पाहून पण करू शकतो.

3. वाईट दिवस टाळा - आपण चिंतीत, उदासीन किंवा आपला मूड ऑफ असल्यास त्याचे भाव आपल्या चेहऱ्यावर दाखवले नाही पाहिजे. असे केल्याने समोरच्या व्यक्तीवर आपले वाईट इम्प्रेशन पडते. त्यांची आपल्या सोबत बोलण्याची इच्छा राहत नाही. आपला दिवस खराब गेला असेल तर त्याचा प्रभाव आपल्या देह बोलीवर नका पडून देत जाऊ.

4. जनसंपर्क वाढवा - हा खंरतर सगळ्यात जुना पण सगळ्यात उपयुक्त नियम आहे. आपले व्यक्तिमत्व विकासासाठी आपला जनसंपर्क दांडगा आणि चांगला असणे खूप महत्वाचे असते.

5. आत्मपरीक्षण करा - आपली प्रतिमा हे आपले नातेसंबंध, दृष्टीकोन, आपले विचार, हेतू आणि ध्येय ठरवत असते. म्हणूनच आत्मपरीक्षण करा. स्वतःची प्रतिमा बनवण्यासाठी स्वतः काही चांगले बदल घडवा. आपल्या मूल्यांना आणि तत्वांना आपल्या विचारांनी बळकटी द्यायला हवी.

6. संभाषण महत्वाचे - नौकरी व्यवसाय असो वा खाजगी आयुष्य, योग्य ठिकाणी, योग्य शब्दांचा योग्य स्वरात वापर करून एखादी गोष्ट योग्य प्रकारे मांडता येणे खूप महत्वाचे असते. पण संभाषण फक्त बोलण्याला नव्हे तर ऐकण्याला आणि प्रतिसाद देण्यालाही तितकेच महत्व आहे. त्यामुळे बोला, ऐका आणि प्रतिसादही द्या.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?