लंच / डिनर आणि पाळावयाचे नियम...

👉 लंच / डिनर आणि पाळावयाचे नियम...

आजकाल हॉटेलमध्ये जाण्याचं प्रस्थ बरंच वाढलंय. ऑफिसमधील फॉर्मल पार्ट्याही असतात. अशावेळी हॉटेलमध्ये गेल्यावर कसंही वागून चालत नाही. लंच किंवा डिनरचं आमंत्रण असेल तर डायनिंग टेबलरवर काही नियम पाळावे लागतात. याबाबत जाणून घेऊयात...

1) फॉर्मल पार्टीला गेल्यानंतर आपण कुठे बसायचं आहे हे विचारून घ्यावं. काही जागा राखीव असू शकतात. प्रत्येकाची बसण्याची वेगळी व्यवस्था केलेली असू शकते. दुसरी महत्वाची बाब म्हणजे फॉर्मल पार्ट्यांना गेल्यावर होस्टनं नॅपकिन मांडीवर ठेवल्यानंतर आपण ठेवायचा असतो हे लक्षात घ्या.

2) फॉर्मल लंच किंवा डिनर असेल तर जेवण तुमच्या ताटात वाढलं जातं. डाव्या बाजूनं वाढायला सुरूवात केली जाते. अनेकदा बुफेचं आयोजन केलेलं असतं. फॉर्मल पार्ट्यांमध्ये काटा चमचा आणि सुरीनं खावं लागतं. काटा चमचा आणि सुरीन खाणं अनेकांना जमत नाही. काटा-चमचा डाव्या हातात धरायचा असतो. सुरी उजव्या हातात धरायची असते. सुरी ताटाच्या 2 ते 3 इंचवर धरायची असते. काट्या चमच्यात घास भरून घेण्यासाठी सुरीचा वापर करता येते.

3) छोट्या समारंभांना गेल्यावर सर्वांना वाढल्यानंतर आपण सुरू करावं तर फॉर्मल ऑकेजनला होस्टनं सांगितल्यानंतर सुरूवात करावी.

4) बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी काटा आणि सुरी ताटात ठेवताना ती व्ही आकारात ठेवावी. ती ताटाच्या मधोधम ठेवणं अपेक्षित आहे.

सर्वसाधारण हे नियम तुम्हाला लंच/डिनर करताना पाळावे लागतात.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?