उष्णतेपासून वाचण्यासाठी खा हे पदार्थ...

👉 उष्णतेपासून वाचण्यासाठी खा हे पदार्थ...

मे हा उन्हाळ्याचा शेवटचा महिना. या महिन्यात उकाडा व ऊन याचा तडाखा सर्वात जास्त असतो. यामुळे अनेक शारीरिक तक्रारी जाणवतात. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणं आणि आहारावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. अशावेळी कोणते पदार्थ खावेत याबद्दल जाणून घेऊ...

👉 आंबा : आंबा हा फळांचा राजा आहे. आंबा शरीरातील उष्णता वाढवते मात्र, रोज आंबा खाणे गरजेचे आहे. आंब्यामुळे शरीराला 'ब' जीवनसत्वाचा पुरवठा होतो.

👉 माठातील पाणी : माठाला गरिबांचा फ्रिज म्हणतात. फ्रिज येण्यापूर्वी माठाचा वापर सर्वात जास्त केला जात होता. माठातील थंड पाण्याचं सेवन करणं उन्हाळ्यात फायद्याचं असतं. शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्याचं काम माठातील पाणी करत असते.

👉 दूध गुलकंद : गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनलेला गोड पदार्थ म्हणजे गुलकंद. दूध गुलकांदामुळे शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो. शांत झोपेसाठी झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध-गुलकंद घेणं आवश्यक आहे.

👉 दहीभात :  दह्याचं सेवन पोटासाठी उत्तम असतं. दहीभात खाण्यामुळे शरीरातील शर्करेचं प्रमाण योग्य राहते तसेच दहीभाताने पचनाक्रियाही सुधारते.

👉 कोकम सरबत : कोकमला मँगोस्टीन म्हणूनही ओळखलं जातं. दुपारच्या जेवणाआधी, सकाळी अकराच्या सुमारास, एक ग्लास सब्जायुक्त कोकम सरबत पिल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलित राहतात.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?