हातावरील मेहंदीचा रंग उठून दिसण्यासाठी…

👉 हातावरील मेहंदीचा रंग उठून दिसण्यासाठी…

सध्या लग्नाचा मौसम सुरु आहे आणि अशात हातावरची मेहंदी रंगली नाही तर चुकल्या सारख्या वाटतं. म्हणून तुमच्या हातावरील मेहंदीचा रंग उठून दिसण्यासाठी खालील उपाय अंमलात आणा...

1) मेहंदी लावण्यापूर्वी हात स्वच्छ करावे आणि नीलगिरी किंवा मेहंदीचे तेल लावावे.

2) मेहंदीला किमान 5 तास तरी हातावर लावून ठेवावे.

3) मेहंदी हलकी-हलकी वाळल्यावर त्यावर लिंबू आणि साखरेचा घोळ लावावा. ज्याने मेहंदी थोड्या वेळ चिकटून राहील.

4) मेहंदी काढताना त्यावर पाणी लागू नये याची काळजी घ्यावी, अन्यथा मेहंदी गडद रंगण्याची शक्यता कमी असते.

5) मेहंदीचा रंग हलका वाटत असल्या त्यावर बाम, आयोडेक्स, विक्स किंवा मोहरीचे तेल लावावे. हे सर्व पदार्थ उष्णता प्रदान करतात आणि याने मेहंदीचा रंग गडद होत जातो.

6) मेहंदी लागलेल्या हातावर लवंगांचा धूर घेऊ शकता. यावर लोणच्याचे तेलही लावू शकतात.

7) मेहंदी रंगविण्याचा एक पारंपरिक उपाय आहे चुना लावण्याचा. पाणी न मिसळता मेहंदी लागलेल्या हातांवर चुना रगडण्याने मेहंदीचा रंग गडद होतो.

8) मेहंदी जरा वाळल्यावर हातांना रजईने झाकू शकता. रात्री मेहंदी लावली असल्यास सर्वात उत्तम. त्यानंतर रजई पांघरून झोपून जावे. याने हातांना उष्णता मिळेल आणि रंग चढेल.

9) मेहंदी नैसर्गिक रूपाने वाळू द्यावी. मेहंदी वाळवण्याची घाई केल्यास त्यावर रंग चढणार नाही.

10) कोणत्याही कार्यक्रमासाठी मेहंदी लावायची असेल तर निय‍त तिथीच्या एक किंवा दोन दिवस आधी मेहंदी लावायला हवी. ज्यानेकरून मेहंदीला गडद रंग चढतो.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?