बाईक चालवताना काय काळजी घ्याल…?

👉 बाईक चालवताना काय काळजी घ्याल…?

आजकाल जवळपास प्रत्येक कॉलेजच्या मुला-मुलींकडे बाईक असतेच आणि नसेल तर त्यासाठी प्रचंड आग्रह असतो. कॉलेज आणि खाजगी क्लासेसचा मेळ जुळून येण्यासाठी बहुदा पालकांकडून मुलासाठी बाईक घेतली जाते. मात्र, कॉलेज लाईफच्या  झगमगाटापुढे आपलं प्रेस्टीज जपण्यासाठी मुलांकडून बाईकचा पुरेपूर गैरवापर होताना आपल्याला दिसते. म्हणून ऐन तारुण्यात अतिउत्साहाच्या भरात आपलं नुकसान होऊ नये म्हणून बाईक चालवताना काय काळजी घ्यावी त्याबद्दल जाणून घेऊ...

👉 चांगली गाडी चालवता येते म्हणून कशीही गाडी चालवू शकतो हा गैरसमज प्रथम मनातून काढून टाका.

👉 बाईक चालवताना फोन आल्यांनतर फोन उचलू नका. गाडी बाजूला थांबवून फोनवर बोला.

👉 गाडी चालवत असताना हेल्मेट व इतर आवश्यक सुरक्षित साधनांचा वापर करा.

👉 एका हाताने कधी गाडी चालवू नका. कारण यामुळे तुमचा बाईकवरचा ताबा सुटू शकतो.

👉 कानात हेडफोन घालून गाडी चालवणे म्हणजे अपघाताला स्वत: निमंत्रण दिल्यासारखे आहे. त्यामुळे हेडफोन घालून गाडी चालवू नका.

👉 अनेक वेळेस ट्रिपल सीटने प्रवास करण्याची वेळ येत असते किंवा स्वतःहून ट्रिपल सीटचा प्रवास केला जातो. परंतु सिंगल किंवा डबल सिटच्यावर कधीही प्रवास करू नये.

👉 बाईकची वेळोवेळी स्थिती जाणून घ्या. इंजिनची काळजी किंवा वेळोवेळी गाडीला ऑइलिंग करा.

👉 प्रवासाला जाण्याअगोदर टायरची हवा चेक करा. अन्यथा प्रवासात मध्येच अडथळा येऊ शकता.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?