"आपलच माणूस लागत...

एक.सुंदर कविता.. नक्की वाचा....

🌻"आपलच माणूस लागत...

👉🏽 आनंदात असताना
       सुखात भागीदार
       कुणीही चालतं,
👍🏼 पण दु:खात रडताना
      अश्रू पुसायला
      आपलंच माणूस लागतं ...

👉🏽 घोळक्यात असताना
      दंगामस्ती करायला
      कुणीही चालतं..
👍🏼 पण एकांतात असताना
      गुपित सांगायला
      आपलंच माणूस लागतं ...

👉🏽 वरवरच्या जखमांना
      फुंकर घालायला
      कुणीही चालतं ...
👍🏼 पण मनात खोलवर
      रुतलेल्या जखमांना
      फूंकर घालायला
      आपलंच माणूस लागतं ...

👉🏽 काळाच्या अंधारात
      विरणार्‍या आठवणींसाठी
      कुणीही चालतं ...
👍🏼 पण मनाच्या कप्प्यात
      घर करण्यासाठी
      आपलंच माणूस लागतं ...

👉🏽 कायमचंच रुसण्यासाठी
      अबोला धरण्यासाठी
      कुणीही चालतं ...
👍🏼 पण आपल्यावर
      रुसण्यासाठी
      रुसवा आपला
      काढण्यासाठी
      आपलंच माणूस लागतं ...

👉🏽 यशाच्या शिखरावर
      बेहोश होण्यासाठी
      कुणीही चालतं..,
👍🏼 पण अपयशाच्या दरीत
      तोल सावरण्यासाठी
     आपलंच माणूस लागतं ...

म्हणून सांगते...आयुष्याच्या वाटेवर नेहमी....
"आपलंच माणूस लागतं..."

@@@@@@@$$$$$$$@@@@@@@

- स्वप्निल भिवाजी आव्हाड, माळवाडी. सिन्नर. नाशिक

Comments

Popular posts from this blog

लेख: आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.