उन्हाळ्यात फिरायचा प्लॅनिंग आहे..?

👉 उन्हाळयात फिरायचा प्लॅनिंग आहे..?

एप्रिल आणि मे हे दोन महिने सुट्टीचे आणि गरमीचे. या दोन महिन्यात उन्हाने सर्वजण हैराण असतात. या दोन महिन्याच्या सुट्ट्या आपण घरातच घालवण्याचे प्रयोजन करत असतो. कारण बाहेर कडक ऊन असल्याकारणाने आपण सहसा बाहेर निघत नाही. तर काही जणांचा थंड वातावरणाचा मनमुराद आनंद लुटण्याचा प्लॅन असतो. म्हणून उन्हाळयात थंडीचा आनंद लुटण्यासाठी काही मस्त ठिकाणे...

👉 महाबळेश्वर : महाबळेश्वर हे सह्याद्रीच्या पर्वत रांगांवर समुद्र सपाटीपासून सुमारे 4500 फुट उंचीवर वसलेले व महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण. बगीचे, उदयाने,  ब्रिटीश-कालीन वैभवसंपन्न आणि मनमोहक वाडे, इमारती व निसर्गाची नवलाई येथे अनुभवायास मिळते.

👉 लोणावळा : लोणावळा तर आपल्या सर्वानाच माहिती आहे. तसेच आपल्या जवळ देखील आहे. उंच कडे, आकर्षक धबधबे, धरणे व नटलेली हिरवाई हे येथील खास आकर्षण. सोबत येथील चिक्की प्रसिद्ध आहे.

👉 गोवा : गोवा म्हटलं की, समोर येतो तो दूरपर्यंत पसरलेला किनारा आणि खळखळणारा समुद्र. प्रत्येक ऋतुमध्ये गोव्याचं वेगळं रूप तुम्हाला पाहायला मिळेल. सोबतच थंड वातावरणा बरोबरच निवांत क्षण देखील तुम्ही येथे अनुभऊ शकता. त्यामुळे गोवा उत्तमच.

👉 शिमला : हिमाचल प्रदेशात वसलेलं हे शहर हिल स्टेशनची राणी म्हणून ओळखलं जातं. अनेक जोडप्याचं हनीमूनसाठी इथे विशेष प्राधान्य असतं. बर्फाने भरलेले डोंगर, सुंदर हिरवीगार झाडं, उंच उंच पर्वत हे येथील मुख्य आकर्षण आहे.

👉 मनाली : हिमाचल प्रदेशात हिमालयाच्या कुशीत वसलेलं अत्यंत सुंदर, मनोरम आणि चमत्कारी परिदृष्य दाखवणार ठिकाण म्हणजे मनाली. जर तुम्ही उन्हाळ्यात फिरायचं नियोजन केलं असेल तर मनालीचा नक्की  विचार करा.

👉 श्रीनगर : श्रीनगर हे अतिशय सुंदर ठिकाण असून याला पृथ्वीवरील स्वर्ग असं बोललं जात.  श्रीनगरमध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत जी पर्यटकांची आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत.

👉 ऊटी : कर्नाटक आणि तामिळनाडूच्या सीमेवर वसलेल्या उटीला 'उधगमंडलम' देखील बोलले जाते. नीलगिरीच्या पर्वत रंगातील हे पर्यटन स्थळ असून याठिकाणी बॉटनिकल गार्डन, ऊटी झील, डोडाबेट्टा चोटी, कालहट्टी जलप्रपात, कोटागिरी असे लोकप्रिय ठिकाणे आहेत.

👉 कोडैकानल : कोडैकानल हे तामिळनाडूतील अतिशय मनमोहक पर्वतीय स्थळ आहे. या ठिकाणी कुरिन्जी फुलांचा मोसम, विशाल चट्टान, शांत झील आणि फुलांचा सडा हा पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्र बिंदू आहे.

👉 मुन्नार :केरळ मधील हे हिलस्टेशन असून मुथिरपुझा, नल्लथन्नी आणि कुंडल या तीन पर्वतांच्या शृखंलांनी तयार झालेले आहे. छोट्या नद्या, झरने आणि थंड वातावरण हे येथील खास आकर्षण सोबत या ठिकाणी ट्रेकिंगचा आणि माऊंटन बाइकिंगचा सुद्धा मनमुराद आनंद लुटू शकता.

संकलन - स्वप्निल भिवाजी आव्हाड, माळवाडी. सिन्नर - नाशिक

Comments

Popular posts from this blog

लेख: आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.