जमिनीच्या प्रकारानुसार करा लागवड
👉 जमिनीच्या प्रकारानुसार करा लागवड
भाजीपाला पिकांची लागवड करताना शक्यतो जमीन कोणत्या प्रकारची आहे याचा विचार केला जात नाही. याचा थेट परिणाम उत्पादनावर होत असतो म्हणून मिरची व वांगी या भाजीपाला पिकांची लागवड करण्यासाठी कशा प्रकारची जमिन निवडावी त्याविषयी खास...
_*मिरची लागवड*_ :
👉 मिरची लागवडीसाठी खास करून मध्यम ते काळी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.
👉 जर जमीन हलक्या प्रकारची असेल तर योग्य खत व पाणी व्यवस्थापनातून सुद्धा पीक चांगले येते.
👉 लागवडीसाठी जमीन खोल नांगरून घ्यावी. नांगरणीनंतर उभ्या-आडव्या कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
👉 वाफे करण्यापूर्वी प्रतिहेक्टरी 40 ते 50 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. रोपांच्या जातीनुसार अंतर ठेवून वाफे तयार करावेत.
👉 रोपवाटिकेत योग्य व्यवस्थापनात वाढलेली 30 ते 40 दिवसांची रोपे लागवडीसाठी वापरावीत.
_*वांगी लागवड*_ :
👉 वांग्यासाठी हलकी ते मध्यम काळी, पोयटा व चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक असते, पोयटायुक्त किंवा भारी जमिनीतही चांगले पीक येते.
👉 लागवडीपूर्वी जमिनीची नांगरट करून दोन तीन वेळा कुळवणी करावी. शेवटच्या कुळवणीपूर्वी हेक्टरी 40 ते 50 गाड्या शेणखत टाकावे.
👉 हलक्या जमिनीत लागवडीपूर्वी शेणखत किंवा कंपोस्ट खताचा भरपूर वापर केल्यास पीक चांगले येते.
👉 मध्यम काळ्या, पोयट्याच्या किंवा भारी जमिनीत लागवड करताना अंतर वाढविणे आवश्यक आहे. कारण या जमिनीमध्ये झाडांची जास्त प्रमाणात वाढ होत असते.
स्वप्निल आव्हाड, माळवाडी..
Comments
Post a Comment