डोळ्यांच्या तक्रारीसाठी सोपे उपाय

👉 डोळ्यांच्या तक्रारीसाठी सोपे उपाय


डोळे आपले महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय. आसपासच्या जगाचे दर्शन आपल्याला डोळेच घडवत असतात. आपली ओळख सांगणारे हे डोळे योग्य काळजी घेतली तरच दीर्घकाळ आपल्याला साथ देऊ शकतात. म्हणूनच डोळ्यांच्या काही किरकोळ तक्रारी दूर करण्यासाठी घरच्या घरी करता येणारे हे काही उपाय खालीलप्रमाणे आहेत...

👉 डोळे चिकटणे : एरंडेल तेल गरम करून काजळासारखे घालावे. आजकाल या तेलातही भेसळ असते. त्यामुळे खात्रीचे तेल आणून प्रथम त्याला एक उकळी द्यावी व गार झाल्यावर गाळून बाटलीत भारवे. हे तेल वापरण्यास निर्धोक असते.

👉 डोळे लाल होणे : दुधात पातळ कापड अथवा कापूस बुडवून त्याच्या घडया बंद डोळयांवर ठेवाव्यात.

👉 डोळे येणे : यावरही एरंडेल तेल काजळासारखे डोळयात घालण्याने आराम पडतो.

👉 रांजणवाडी आल्यास : खारीक बी पाण्यात उगाळून त्याचा लेप रांजणवाडीवर लावावा. 8 दिवस हा उपचार करावा.

👉 डोळयात काही गेल्यास : कपात अथवा बशीत स्वच्छ पाणी घेउन त्यात पापण्यांची उघडझाप करावी. अथवा कापूस ओला करून डोळे उघडून जेथे कण दिसेल तेथून अलगद फिरवावा. कापसाला चिकटून डोळयात गेलेला कण बाहेर येतो.

👉 डोळयांची जळजळ व खाजणे : गार पाण्याच्या घडया अथवा पिकलेल्या केळयाच्या सालीची आतील बाजू डोळे बंद करून त्यावर ठेवावी. 

👉 डोळयात घाण येत असल्यासही एरंडेल तेलच काजळासारखे डोळयात घालणे उपयुक्त ठरते.

स्वप्निल आव्हाड, माळवाडी. सिन्नर.

Comments

Popular posts from this blog

लेख: आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.