श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज
👉 श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज
आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. 1630 मध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून महाराजांचे नाव ‘शिवाजी’ ठेवले गेले. पुढे जाऊन महाराजांनी रचलेला इतिहास सर्वश्रुत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची महती जगभरात प्रसिद्ध आहे. शिवजयंती निमित्त आज जाणून घेऊयात महाराजांविषयी...
👉 शिवाजी महाराज हे जन्माने राजपूत्र नव्हते. त्यांनी मुघल, निजाम, आदिलशाही, ब्रिटीशांशी झुंज देऊन स्वत:चं राज्य स्वतः तयार केलं. महाराजांनी पहिला किल्ला त्यांच्या वयाच्या 16 वर्षी जिंकला होता.
👉 इतर राजाप्रमाणे शिवाजी महाराजांना ऐश आरामात राहणे पसंत नव्हते. त्यांनी स्वत:साठी एकही महाल उभारला नाही. त्याऐवजी त्यांनी 100 पेक्षा जास्त किल्ले बांधले.
👉 शिवाजी महाराजांच्या आधी रयतेकडून कोणत्याही नियमाविना कर आकारला जायचा. पण शिवाजी महाराजांनी ही पद्धत बदलून शेतक-यांकडून कर वसुली कमी केली.
👉 ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःची जमीन नव्हती अशा लोकांना शिवाजी महाराजांनी सरकारी जमीन कसायला दिली, सोबतच पुणे परिसरात अनेक धरणंही बांधली.
👉 इंग्रजांच्या आक्रमणापासून वाचण्यासाठी शिवाजी महाराजांनी आरमार तयार केलं होतं. त्यामुळे त्यांना फादर ऑफ इंडियन नेव्ही असेही म्हणतात.
👉 शिवाजी महाराज हे भारतातील सर्वात धर्मनिरपेक्षतावादी राजा म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सैनिक होते. इतरही अनेक जातींची लोकं त्यांच्या सैन्यात होती. त्यांचा वैयक्तिक सेवक मदारी मेहतर होता, त्यांचा अंगरक्षक मुस्लिम होता, अफझलखानाच्या भेटीच्यावेळी त्यांचा अंगरक्षक असलेला जिवा महाला न्हावी होता, एवढेच नाही तर सिद्दी जोहरला चकवणारा त्यांचा तोतयादेखील शिवा काशिद नावाचा न्हावीच होता.
👉 शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्याला असा आदेश दिला होता की, लहान मुलांना आणि महिलांना जराही नुकसान पोहचवू नका. महिलांचा आदर करणे हा त्यांचा आदेश होता.
👉 त्याकाळी सती प्रथा होती पण पती शहाजीराजे यांच्या निधनानंतर राजमाता जिजाऊ सती जाऊ इच्छित होत्या परंतु शिवाजी महाराजांनी त्यांना रोखले व आपल्या प्रजेला एक उत्तम उदाहरण घालून दिले.
👉 शिवाजी महाराज हे श्रद्धाळू होते पण अंधश्रद्धाळू नव्हते. अमावस्येची रात्र ही अपशकून मानली जाते. पण त्यांनी कित्येक लढाया अमावसेच्या रात्रीच लढल्या होत्या.
👉 शिवाजी महाराज हिंदू धर्म पाळणारे होते पण त्यांची धर्मश्रध्दा आंधळी नव्हती. धर्माला मान्य नसणाऱ्या गोष्टीही करून ते कार्य करत होते. कारण त्यांना कार्य महत्त्वाचे होते, धर्म नव्हे.
@@@@@@@@@@@@@@@@@@@
✍🏻स्वप्निल भिवाजी आव्हाड✍🏻
शिवाजीनगर, माळवाडी. सिन्नर - नाशिक
*📞☎ +९१७७०९७६१८५२ ☎
Comments
Post a Comment