स्मृतीस्थळ

*स्मृतीस्थळ*

*ऐैशी निग्रही स्री पुन्हा होणे नाही-*  *"हिराईसा*

बहुरत्न वसुंधरा,हे खरे आहे.आपल्या पंथातही एका पेक्षा एक स्रीया होऊन गेल्या , पण आपण ज्या स्री जीवना विषयी पहाणार अहोत, ती एक महान, संयमी स्री आहे, अशी स्री झाली नव्हती व पुढे होण्याची शक्यता नाही,
               
प्रपंचात राहुनही प्रपंचा वेगळी, संन्यास घेतल्यावर मुलगा, पतीला अनुसरण्यास निमित्त असुनही, त्यांच्या ममतेच्या वेगळी राहाणारी, धर्मावर दृढ, स्पष्टवक्ती, विरक्त, मार्गाचा अभीमान बाळगणारी, दृढत्व अंगीकरणारी, विरक्ताची कसवटी, आचार धर्माचे पालन करणारी, आचारात चुकणा-यांना शिक्षा करणारी, संन्यास धर्माचे यथोचित पालन करून पंथात शिस्त ठेवणारी, इतरांना शिकवणारी, निग्रही, कडक स्वभावी, दामोदर पंडीतांच्या लेखणीतील तृटी तात्काळ लक्षात आणुन देणारी, ती एक परिक्षक होती, मार्गदर्शक होती.

भटोबासांनी एक आख्याइका सांगतांना हिराइसाच्या जीवनातील प्रत्यक्ष घटलेली घटना सांगीतली. एकवेळ भटोबास हिराइसाला भेटण्यासाठी गेले, तेव्हा तीची मुलगी फार अजारी अशक्त होती, भटोबासांच्या लक्षात येउ नये म्हणुन तीने संभ्रम केला, यथोचित अभ्यागता केली, सर्वांना जेवायला वाढले, तितक्यात हिराइसाची अजारी मुलगी मरण पावली, कुणाच्या लक्षात येउ नये म्हणुन तीने मरण पावलेल्या मुलीला कपड्याने झाकुन गुंडाळुण ठेवले, सर्वांचे जेवण झाले, *हिराइसाने* स्वत: जेवण केले, कारण आपण जेवण नाही केले तर बरे दिसणार नाही म्हणुन, मुलीला झाकुन ठेवुन अभ्यगताचे उचित स्वागत केले, अशुभ घडल्याची यत्किंतही कल्पना येऊ दिली नाही, दु:ख दिसु दिले नाही, वागण्यात बदल होऊ न देता अदरातिथ्य केले, लोक संग्रह म्हणुन जेवण झाल्यावर "आताच होती हो SSSS कशी सरली हो SSSS असे म्हणुन रडु लागली---
तसे पाहीले तर स्रीया खुपच भावुकवृत्तीच्या असतात, पण येथे मात्र हिराइसा फार दृढ दिसत आहे, ही तिच्या आचरणाची चरमसीमा होय,
प्रापंचीक जीवनाचा मोह स्रीयांना फारच असतो त्यामुळे संसारातुन लवकर मुक्त होत नाही, या मताला मात्र हिराइसाने तडा दिला, तीने दामोदर पंडीतांना संन्यास घेण्याविषयी रोखठोकपणे विचारणा केली, *"पंडतो तुम्ही संन्यास घेता, की मला संन्यास घेउ देता,"* पंडीतांनी म्हटले "तु आधी संन्यास घे, मुलाचे लग्न झाल्यावर मी संन्यास घ्यायला येइन,
हिराइसा अनुसरली, पंडीतांनी मुलाचे लग्न केले, तरी आले नाही, तेव्हा हिराइसाने लिखीत लिहुन पाठवले *"ज्या चुलीची खीर खाल्ली, त्या चुलीची राख खाल ? "*  
हिराइसाच्या स्वभावाची जाण पंडीतांना असल्यामुळे ते म्हणतात, "आता कोपली, निघावे लागेल,"  पंडीतही अनुसरले,
हिराइसाचा मुलगा व्यापारा निमित्त दुरदेशी गेला तेव्हा येतांनी लुटारुनी धरले तेव्हा त्याने मनात म्हटले ह्यवेळी मी सुटलो तर अनुसरेन, दैवयोगाने सुटल्या नंतर मुलगाही अनुसरला.

काही दिवसांनी पंडीत सरले,पतीनिधनाची
वार्ता एेकुन तीने म्हटले,  *"भले केले पंडीतो, मरो जाणीतले, देहांती मज वेगळे केले,"* काही दिवसांनी मुलगा सरला, पुत्र निधनाची वार्ता एेकुन म्हटले, *"चांगले झाले, की संसार चक्रातुन मुक्त मिळाली, त्याने ईश्वरपद प्राप्त केले, आाजपासुन मी निश्चिंत झाले,"*   असे उदगार जी स्री काढते तिची संन्यासवृत्ती, सहनशिलता कशी असेल, तिच्या स्थितप्रज्ञवृत्तीचा येथे प्रत्यय येतो.

भटोबास तीच्याबद्दल म्हणतात, *"रुपैमागा मार्गाचा अभिमान हिरइसी असे गा,"*
  या उक्तीतुन स्पष्ट होते, कि ती परमार्गात धर्मी किती दक्ष होती *"अशा या महान विदुशीला दंडवत प्रणाम "*

~@~@~@~@~@~@~@~@~@~@
✍🏻स्वप्निल भिवाजी आव्हाड✍🏻​​​​​​​​​​​​​​​​​
शिवाजीनगर, माळवाडी. सिन्नर - नाशिक​​​​​​​​​
📞☎ +९१७७०९७६१८५२ ☎​​​​​​​​​

Comments

Popular posts from this blog

लेख: आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.