๐ฎเคเค्เค्เคฏा เคेเคณ्เคฏाเคे เคเคเคฒेเค : Recipe
🌮कच्च्या केळ्याचे कटलेट : Recipe
साहित्य:
• २ कच्ची केळी
• १ मध्यम बटाटा, उकडलेला
• १/४ कप साबुदाणा
• २ टेस्पून उपासाची भाजणी
• ३ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
• ३ हिरव्या मिरच्या + १/२ टिस्पून जिरे + १/४ कप कोथिंबीर यांची पेस्ट
• १ टेस्पून लिंबाचा रस
• चवीपुरते मिठ
• तूप किंवा शेंगदाणा तेल, तळण्यासाठी
कृती:
• साबुदाणा धुवून त्यातील पाणी काढून टाकावे. झाकण ठेवून ४ तास झाकून ठेवावा.
• साबुदाणा निट भिजला कि केळे सोलून किसून घ्यावे. नंतर साबुदाणा, किसलेले केळे, उकडून कुस्करलेला बटाटा, उपासाची भाजणी, शेंगदाणा कूट, मिरचीपेस्ट, लिंबू रस, आणि मिठ एकत्र करावे. निट मळून गोळा तयार करावा. हा गोळा समान विभागून मध्यम आकाराचे कटलेट बनवावे. आवडीप्रमाणे आकार द्यावा.
• तेल किंवा तूप गरम करावे. तयार कटलेट मध्यम आचेवर तळून घ्यावे.
• गोड लिंबाच्या लोणच्याबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.
Comments
Post a Comment