ЁЯСз ЁЯТЗ рдХेрд╕рдЧрд│рддी рд░ोрдЦрддीрд▓ рд╣ी 'рел' рдпोрдЧाрд╕рдиे

👧 💇 केसगळती रोखतील ही '५' योगासने

आजकालच्या आधुनिक जीवनात केसगळतीची समस्या अगदी सामान्य झाली आहे. त्याचबरोबर केस अकाली पांढरे होण्याची समस्या वाढताना दिसत आहे. चिंता, हार्मोन्सचे असंतुलन, खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी आणि वेळा हे केसगळतीचे प्रमुख कारण आहे. पण यावर योगसाधना हा एक उत्तम उपाय आहे. यामुळे केसांपर्यंत रक्तप्रवाह चांगल्या प्रकारे होतो आणि मानसिक ताण, भूक न लागण्याची समस्या, चिंता यापासून सुटका होते.

भुजंगासन:
वारंवार पित्त होणे हे देखील केसगळती एक महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे पित्त नियंत्रित ठेवण्यासाठी भुजंगासन खूप फायदेशीर ठरते.

पवनमुक्तासन:
या आसनामुळे पोटातील गॅस दूर होवून पचनशक्ती सुधारते. कंबरच्या खालचे स्नायू मजबूत होतात.

वज्रासन:
वज्रासन ही एक धानात्मक स्थिती आहे. यामुळे मूत्रासंबंधित समस्या, पोटातील गॅस दूर होण्यास मदत होते. अन्नाचे पचन चांगल्या प्रकारे होते. त्याचबरोबर वजन कमी करण्यास मदत होते. 

अधोमुख शवासन:
या आसनामुळे शरीरभर रक्तसंचार सुरळीत होतो. डोक्याला रक्ताचा उत्तम पुरवठा होवून थकवा दूर होतो. निद्रानाशाचा त्रास दूर होण्यासही हे आसन फायदेशीर ठरते.

सर्वांगासन:
या आसनामुळे थॉयरॉईड ग्रंथीचे पोषण होते. यामुळे पचनतंत्र सुधारते. डोक्याच्या दिशेने रक्तप्रवाह होतो. त्यामुळे केसगळती, केस अकाली पांढरे होण्याची समस्या कमी होण्यास मदत होते.

Comments

Popular posts from this blog

рд╕рдорд░्рде рд░ाрдорджाрд╕ рд╕्рд╡ाрдоींрдЪी рдЕрддिрд╢рдп рд╕ुंрджрд░ рд░рдЪрдиा. рд╣ी реиреж рдХрдбрд╡ी рдо्рд╣рдгрдЬे реиреж рд░рдд्рдиे рдЖрд╣ेрдд.

рдоूрд▓рдЧीрдЪी рддрдХ्рд░ाрд░ - рдХрд╡िрддा

рд╢िрд╡рдЬрдпंрддी рддिрдеीрдк्рд░рдоाрдгे рдХा ?