इन्स्टंट जिलेबी

इन्स्टंट जिलेबी

साहित्य:
मैदा - १ कप
सोडा - १/२ टी स्पून किंवा १/४ टी स्पून
सायट्रिक अ‍ॅसिड - १/२ टी स्पून
साखर - १ कप
हळद - १/२ चिमूटभर
तूप - तळण्यासाठी
तेल - १ टेबलस्पून

कृती:
१. साखरेचा एकतारी पाक तयार करा.
२.मैदयामध्ये सायट्रि़क अ‍ॅसिड, हळद व पाणी घालून भज्याच्या पीठासारख मिश्रण तयार करा पण थोड घट्ट हव. जास्त पातळ करू नका.
३. तेलामध्ये सोडा घालून चमच्याने ढवळून घ्या.
४. कढईत तूप तापत ठेवा.
५. तेल आणि सोडयाचे मिश्रण मैदयामध्ये घाला आणि फेसून घ्या.
६. हे मिश्रण प्लास्टीकच्या सॉसच्या बॉटलमध्ये भरा आणि तूपात जिलेब्या पाडा. मध्यम आचेवर तळून साखरेच्या पाकात घाला. एक तळणीचा घाणा होईपर्यंत जिलेबी पाकात ठेवा.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?