राष्ट्रपतींची निवड कशी होते?

👉 राष्ट्रपतींची निवड कशी होते?

राष्ट्रपती म्हणजे देशाचे प्रथम नागरिक. हुद्द्याच्या हिशोबाने पंतप्रधानांपेक्षाही त्यांचे स्थान उच्च. सामान्य माणसाला राष्ट्रपतीबद्दल भलतेच कुतुहूल असते आणि अशावेळी सगळ्यांच्या मनात एक प्रश्न येतो की, आपल्या देशाचे राष्ट्रपती निवडले कसे जातात? आपल्या देशामध्ये संविधानातील कलम 54 मध्ये राष्ट्रपती निवड प्रक्रीयेचे सविस्तर वर्णन आढळते. या प्रक्रीये अंतर्गत लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सदनातील सदस्यांच्या एका निर्वाचन समितीद्वारे राष्ट्रपतींची निवड केली जाते.

नुकतेच भारताच्या 14 व्या राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. देशाचे पुढचे राष्ट्रपती निवडण्यासाठी 17 जुलैला मतदान होईल आणि 20 जुलै पर्यंत मतांची मोजणी झाली असेल. येत्या 25 जुलैला सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्याआधीच नव्या राष्ट्रपतींसाठी निवडणुक होणे आवश्यक आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एक खास प्रक्रिया राबविली जाते ज्याला इलेक्ट्रॉल कोलाज म्हटले जाते.

👉 राष्ट्रपतीपदासाठी पात्रता -

1) उमेदवार भारताचा नागरिक असावा.
2) उमेदवाराचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त असले पाहिजे.
3) उमेदवारामध्ये लोकसभेचा सदस्य बनण्याची योग्यता हवी.
4) उमेदवार कोणताही लाभ प्राप्त करण्याच्या स्थितीमध्ये नसावा.
5) तो लोकसभा किंवा राज्यसभेचा सदस्य नसावा.

👉 राष्ट्रपती कसे निवडले जातात?

देशातील लोक प्रत्यक्ष मतदान करून राष्ट्रपती निवडत नाहीत. तर लोकांनी ज्यांना निवडले ते लोकसभेचे खासदार, विधानसभेचे आमदार आणि राज्यसभेचे खासदार राष्ट्रपतीपदासाठी मतदान करतात आणि राष्ट्रपती निवडतात. यातले सगळे प्रतिनिधी हे निवडलेले असतात. कुठलाही नामांकित प्रतिनिधी या निवडणुकीसाठी मतदान करु शकत नाही. हे मतदान गुप्त पद्धतीने होते. कुणी कुठल्या उमेदवाराला मत दिले हे शेवटपर्यंत कळत नाही. सगळ्यात महत्वाचे म्हणजे कुठलाही पक्ष त्यांच्या उमेदवारासाठी वा इतर उमेदवारासाठी व्हीप लागू करू शकत नाही. प्रत्येक मतदाराला कुठल्याही उमेदवारास मत देण्यास स्वतंत्र असतो.

👉 राष्ट्रपती निवड प्रक्रीयेसाठी गठीत केलेली निर्वाचन समिती

या समितीमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्य अर्थात सर्व खासदार आणि विधानसभेसाठी निवडले गेलेले सर्व सदस्य यांचा समावेश असतो. राष्ट्रपती निवड प्रक्रियेमध्ये निर्वाचित समितीमधील सर्व सदस्य सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टम आणि सिक्रेट बेलोट द्वारा मतदान करतात. एम.पी आणि एम.एल.ए. यांच्या मतांमध्ये युनिफोर्मीटीआणि पॅरिटी या दोन नियमांचं पालन करण अतिशय गरजेचे असते.

युनिफोर्मीटी म्हणजे प्रत्येक राज्याच्या एम.एल.ए.च्या मतांची संख्या त्या राज्याच्या लोकसंख्येच्या गुणोत्तरामध्ये असेल. हे ठरवण्यासाठी एक फॉर्म्युला देण्यात आला आहे. राज्यामध्ये निवडले गेलेले एकूण एम.एल.ए. / 1000. या फॉर्म्युलाचा वापर करून प्रत्येक राज्याच्या एम.एल.ए. मतांची संख्या माहित करून घेतली जाते आणि सर्व संख्या हाती आली की त्याची सरासरी काढली जाते.

पॅरिटी म्हणजे सर्व एम.पी.च्या मतांची संख्या सर्व एम.एल.ए. च्या मतांच्या संख्येएवढी असली पाहिजे. यासाठी देखील एक फॉर्म्युला देण्यात आलेला आहे. सर्व राज्यांतील एम.एल.ए.च्या मतांची एकूण संख्या / लोकसभा आणि राज्यसभेमध्ये निवडल्या गेलेल्या एकूण एम.पी.ची संख्या.

राष्ट्रपती निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला किमान आवश्यक मत मिळवावं लागतं. यासाठी देखील एक फॉर्म्युला देण्यात आलेला आहे. विजयी कोटा = वैध मतांची एकूण संख्या / एकूण सीट्स + 1 म्हणजेच 1+1+1.

अगोदर सांगितल्याप्रमाणे सिंगल वोट सिस्टमचा वापर केला जातो, ज्यामध्ये एक मतदार एकच मत देऊ शकतो. तसेच या प्रक्रियेमध्ये Indication of Preferences by the Electors देखील महत्त्वाचे ठरते. यामध्ये मतदार बेलोट पेपरवर इच्छुक उमेदवारांची 1,2,3,4,5 या प्राधान्य क्रमाने नावे लिहितो. ज्या उमेदवाराला या सदस्याने पहिले प्राधान्य दिले आहे त्याला त्याचे मत जाते, पण समजा हा उमेदवार विजयी कोटा मिळवू शकला नाही किंवा इतरही उमेदवार मिळवू शकले नाहीत तर त्याने ज्या उमेदवाराला दुसरे प्राधान्य दिले आहे त्याला त्याचे मत जाते.

जर कोणताच उमेदवार विजयी कोटा मिळवू शकला नाही तर मात्र ज्या उमेदवाराला सगळ्यात कमी मते आहेत त्याला बाद केले जाते आणि त्याची मते सर्वात जास्त 2 रे प्राधान्य मिळालेल्या उमेदवाराला दिली जातात. जोवर एखादा उमेदवार विजयी कोटा मिळवत नाही तोवर ही प्रक्रिया सुरु राहते. परंतु सहसा अशी परिस्थिती उद्भवत नाही आणि राष्ट्रपती हा बहुमताने निवडला जातो.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?