तुम्हालाही या सवयी असतील तर .....

तुम्हालाही या सवयी असतील तर .....

🍄 पोटातील गॅस रोखणे
पोटातील गॅस रोखल्याने पोटदुखी, मुळव्याध, डोकेदुखी, हृदयरोग, मूत्र थांबने, डोळ्यांचे आजार आणि इतरही अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे आरोग्याचे रक्षण करण्यासाठी पोटात गॅस तयार होतील असे पदार्थ खाऊ नका. जर असे झालेच तर गॅस चुकूनही रोखू नका. याचा त्रास तुम्हाला नंतर भोगावा लागेल.

🍄 मूत्र रोखणे
मूत्र रोखल्याने अनेक समस्या होऊ शकता. उदाहरणार्थ सांधेदुखी, मुतखडा, किडनीचे आजार आणि गॅस थांबवल्याने होणा-या समस्या. यामुळे काहीही झाले तरी मूत्र रोकू नये.

🍄 ढेकर रोखणे
ढेकर रोखल्याने जेवणाची इच्छा राहत नाही. त्यासोबतच डोकेदुखी, छातित दुखणे, उल्टी, उचकी, पोटदुखी अशा समस्या होऊ शकतात. यामुळे ढेकर आल्यावर कधीच रोकु नये.

🍄 शिंक रोखणे
शिंकेचा वेग रोखल्याने नेत्र रोग, डोके दुखी, लवका, कानाची समस्या, फुफ्फूसांतील रोग आणि दम्यासारखे अनेक रोग होऊ शकता. यामुळे शिंक कधीच रोकु नये.

🍄 तहान रोखणे
तहान लागल्यावर लगेच पाणी प्यावे. तहानेची तीव्रता रोकल्याने तोंड कोरडे पडणे, रक्तदाब कमी होणे, बहीरेपणा, हृदयरोग, चक्कर येणे या सारख्या समस्या होऊ शकता.

🍄 भुक रोखणे
भूक कधीच थांबवुन नये. भूक लागल्यावर लगेच जेवण करुन घ्यावे. असे केल्याने डोके दुखी, पोटात जळजळ, लो ब्लड प्रेशर, बेशुध्द होणे, उलटी आणि अशा अनेक समस्या होऊ शकता. आयुर्वेदातही सांगितले आहे की, खुप वेळ भुक रोखुन धरल्याने डोळे कमकुवत होतात.

🍄 उल्टी रोखणे
उल्टी रोखल्याने शरीरात जळजळ, त्वचेसंबंधीत रोग, पचनक्रियेचे रोग, डोकेदुखी, गुप्तांगाच्या समस्या, खोकला, श्वासा संबंधीत आजार यासारख्या अनेक समस्या होऊ शकता.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?