๐ถ เคธंเคीเคค๐ถ
🎶 संगीत🎶
जगणे व्हावे ऐसे गाणे
अवघे सुरमयी 'घराणे' ।।
भिन्न हे 'राग' जरीही
'स्वरभाव 'ते एकही ।।🎼
मधुस्वरांचा 'थाट 'हा
सुरातुनी पाझरावा ।।🎶
'आरोह' नि 'अवरोह'
भगवंताचा समारोह ।।
शब्द असती 'वादी'
नाती असावी 'संवादी' ।।
वर्जिता सा रे 'ग म '
अचूक लागे 'पंचम' ।।
'शुद्ध' आणि 'कोमल'
भाव मनीचे तरल ।।
सुख दुःखाचा 'ताल'
तोच कसोटीचा 'काल'।।
साधता सुंदर 'लय'
नच उरे त्यास भय ।।
'चलन' असे सोपे सरळ
गाता घडे मनोमिलन ।।
'सर्वकालीन' मैफील अशी
सप्तसुरांची बरसात जशी !!!
🎶🎵🎹🎼🎶🎹🎼
Comments
Post a Comment