Ⓜ संपत्ती निर्मितीची ची दशसूत्रे Ⓜ

Ⓜ संपत्ती निर्मितीची ची दशसूत्रे Ⓜ

अशा या काही १० गोष्टी आहेत. या आधी त्या केल्या नसतील तर बचत, गुंतवणूक, संरक्षण या वित्तीय योजनेला चालना द्याल, याची स्वत:ला खात्री द्या 

१. डिसेंबर २०१७ पर्यंत तुमच्या सर्व मालमत्तेसह, तुमचे काही संपत्तीचे ध्येय असेल तर ते मांडा.

     एकदा का तुमचे ध्येयनिश्च्ती झाली की ते पूर्ण करण्यासाठी नियमितपणे किती गुंतवणूक करणे आवश्यक आहे ते ठरवा. घरासाठीचे बयाणा देणे यासारख्या त्यातल्या त्यात जवळच्या ध्येयासाठी महत्त्वाचे म्हणजे, गुंतवणूक आणि रोकड सुलभता हवी आणि परताव्यांशी फारकत घेणारी नसावी. असे असले तरीही, संपत्ती निर्मितीच्या अनेक वर्षांच्या ध्येयासाठी प्रत्येकाने पारंपरिक समभाग साधनांध्ये गुंतवणूक करायला हवी.

२. झेपेल इतकाच खर्च करा. महिन्याला एकूण ३० टक्कय़ांखाली खर्च असू द्या.

     ध्येय मांडून ठेवायला हवे आणि किराणा माल, मुलांचे शिक्षण, वाहतूक इत्यादींसारख्या (घराखेरीज) गरजेच्या गोष्टींचा खर्च तुमच्या करमणूक आणि इतर मुख्यतारीच्या गोष्टींआधी मांडून ठेवायला हव्यात.

३. मासिक उत्पन्नातील ३० टक्के रक्कम एसआयपींच्या इक्विटी म्युच्युअल फंडात टाका

     अनेक कुटुंबांचा एकूण उत्पन्नातील ७० टक्के खर्च हा भाडय़ाच्या किंवा तारण कर्जावरील घरांमध्ये आणि नियमित खर्चांमध्ये येतो. उर्वरीत ३० टक्के रक्कम मात्र दीर्घकाळच्या चांगल्या कामगिरीच्या इक्विटी म्युच्युअल फंडांत गुंतवणे गरजेचे आहे. म्युच्युअल फंडांचे दीर्घकालीन १२-१६ टक्के करमुक्त परतावे मिळतात.

४. जास्त व्याज असलेले वैयक्तिक कर्ज आणि देणी तातडीने संपवा.

     व्याजदर असलेले वैयक्तिक कर्ज वर्षांला २० टक्कय़ांएवढी जास्त रक्कम घेते, अशा कर्जांची जबाबदारी असणे म्हणजे बचतीला  मोठी गळती असण्यासारखेच आहे. वैयक्तिक कर्ज घेणे शक्यतो टाळा.

५. वार्षिक उत्पन्नाच्या ५-१० पट टर्म प्लॅनची ऑनलाइन खरेदी (कमीत कमी १ कोटी रुपये) करा.

     तुम्ही कुटुंबाचे कर्ते असाल, तर कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर असते. आजच्या काळात तुमचे आयुष्य परवडणाऱ्या किंमतीच्या टर्म प्लॅनने सुरक्षित करणे आवश्यक आहे. आणि यात चालढकल करण्याची कुठलीही कारणे शोधू नका. तुमचे कुटुंब सुरक्षित आहे याची खूणगाठ मनाशी बांधल्यावरच तुम्हाला नक्कीच सुखाची झोप लागू शकेल!

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?