उन्हामुळे केस ड्राय झाले आहेत का? 'या' टिप्स करतील मदत

☀ *उन्हामुळे केस ड्राय झाले आहेत का? 'या' टिप्स करतील मदत*

👉🏻 _उन्हाळ्यामध्ये त्वचेप्रमाणेच केसांनाही एक्स्ट्रा केअरची गरज असते. हिटमुळे केस डल, ड्राय आणि डॅमेज होतात. उन्हाचा परिणाम केसांवर होऊ नये त्यासाठी काही सोप्य टिप्स..._

👉🏻 _उन्हामध्ये केस छोटेच ठेवा, कारण उन्हाळ्यामध्ये घाम, प्रदूषणामुळे केस गळतात. अशातच मोठ्या केसांची काळजी घेणं अवघड होतं._

👉🏻 _छोटे केस करायचे नसतील तर केसांवर हॅट, स्कार्फ बांधूनच घरातून बाहेर पडा. लक्षात ठेवा, स्कार्फ जास्त टाइट बांधू नका आणि सूर्याच्या प्रखर किरणांपासूनही केसांचा बचाव करा._

👉🏻 _जर तुम्हाला जास्त वेळ उन्हामध्ये थांबावं लागणार असेल तर केसांवर सनस्क्रिन लावा. सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत शक्यतो घरातून बाहेर पडणं टाळा._

👉🏻 _उन्हाळ्यामध्ये हेअर ड्रायर आणि कर्लरस वैगरेचा वापर कमीत कमी करा. उन्हाळ्यामध्ये एसीमुळेही केसांचं नॅचरल मॉयश्चरायझर कमी होतं._

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?