आज जन्माष्टमी; तुम्हाला 'हे' माहित आहे का?

🤔 आज जन्माष्टमी; तुम्हाला 'हे' माहित आहे का?

श्रावण महिन्यात वद्य अष्टमीला रात्री 12 वाजता रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला. कंसाची बहिण देवकी व वासुदेव यांचा कृष्ण हा आठवा मुलगा होता. हाच दिवस कृष्णजयंती, जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी या नावांनी ओळखला जातो. हा जन्मदिवस संपूर्ण भारतात तसेच विदेशात देखील उत्साहात साजरा केला जातो.

💁‍♂ कुठे कशी साजरी होते जन्माष्टमी?

1) महाराष्ट्र : येथे कृष्णजन्म गोकुळाष्टमी या नावाने साजरा केला जातो. या दिवशी उपवास केला जातो. रात्री 12 वाजता कुष्णाच्या मुर्तीला पाळण्यामध्ये ठेवून त्याला दही-दूधाचा प्रसाद दाखवला जातो. तर दुसऱ्या दिवशी दही हंडीचा उत्सवदेखील मोठ्या आनंदात साजरा करण्यात येतो.

2) गुजरात आणि राजस्थान : या ठिकाणी देखील मोठया उत्साहात कृष्ण जन्म साजरा केला जातो. यादरम्यान कृष्णाची मंदिरे सजविली जातात. रात्रभर भजन आणि रासलीलेचा कार्यक्रम आयोजित केला जातो.

3) ओडीसा आणि बंगाल : बंगालमध्ये देखील कृष्ण जन्माला एक वेगळंच स्थान आहे. लहान मुलांना कृष्णाप्रमाणे सजवले जाते. कृष्ण जन्मावरील नृत्याविष्कार सादर केले जातात.

4) दक्षिण भारत : या  दिवशी कृष्णाच्या मंदिरांना दिव्यांची सजावट केली जाते. तांदळाच्या पिठाच्या रांगोळ्या काढल्या जातात. गीतेचे वाचन तसेच भगवान कृष्णासाठी विशेष नैवेद्य केला जातो.

❓ तुम्हाला 'हे' माहित आहे का?

● कृष्ण जन्माष्टमी, साटम आथम, गोकुळाष्टमी,अष्टमी रोहिणी, श्रीकृष्ण जयंती, श्री जयंती या नावाने देखील जन्माष्टमी साजरी केली जाते.
● दक्षिण आशिया खंडात खालील समुद्री भागातील देश गयाना, त्रिनिनाद, टोबागो,जमैका आणि डच कॉलनी ऑफ सुरीनाम येथे जन्माष्टमी साजरी केली जाते. 
● मथुरा आणि वृंदावन श्री कृष्ण जन्मभूमी मध्ये जन्माष्टमी आठवडाभर साजरी केल्या जाते.
● सिंगापूर येथील जन्माष्टमी पाहण्यासारखी असते. येथे कृष्ण नामस्मरण करण्याची स्पर्धा सुध्दा भरविल्या जातात.
● पाकिस्तानमध्ये श्री स्वामीनारायण मंदिर कराची येथे सुध्दा जन्माष्टमी भजन कीर्तनासहित साजरी केली जाते.
● क्वालालंपूर येथे देखील जन्माष्टमी साजरी केली जाते. याप्रसंगी अन्नदान सुध्दा मोठ्या प्रमाणात होते.
● फ्रान्स येथील पॅरिसमधील मंदिरात 2 दिवस महोत्सव साजरा केला जातो. रात्री 12 वाजता श्री कृष्णास गंगाजलाने अंघोळ घालून विधिवत पूजा केली जाते.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?