उन्हाळ्यात चेहऱ्याच्या समस्या कशा सोडवाल?

उन्हाळ्यात चेहऱ्याच्या समस्या कशा सोडवाल?

🧐 उन्हाळ्यात चेहऱ्याची काळजी घेणे खूप गरजेची असते. यासाठी आपण काही उपाय जाणून घेऊयात...  

▪ *दुधाची साय* : सॉफ्ट, तजेलदार त्वचेसाठी चेहऱ्यावर साय लावणं फायदेशीर ठरतं. चेहऱ्यावरील डाग दूर होण्यास साय महत्वाची ठरते. साय तेलकट असते त्यामुळे चेहरा मुलायम होतो, तसेच चेहऱ्याचा रंगही उजळण्यास मदत होते. दूधाची साय घ्या व त्यामध्ये चिमूटभर हळद एकत्र करून कॉटन बॉल्सच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटांनी चेहऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून टाका.

▪ *बेसन* : बेसन, चंदन, हळद इत्यादी पदार्थ एकत्र करून एक मिश्रण तयार करा व चेहऱ्यावर लावा. आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा याचा वापर करा. तुम्ही आवश्यक असेल तर दररोजही चेहऱ्यावर हे मिश्रण लावू शकता. या फेस पॅकमध्ये वापरण्यात येणाऱ्या सर्व गोष्टी नैसर्गिक असल्यामुळे याचे कोणतेही साइड इफेक्ट्स होत नाहीत.

▪ *गुलाब पाणी* : 2 ते 3 कॉटन बॉल्स गुलाब पाण्यामध्ये भिजवून फ्रीजमध्ये ठेवून द्या. काही वेळानंतर त्या कॉटन बॉल्सनी तुमच्या चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटांसाठी मसाज करा. लक्षात ठेवा की, मसाज करण्याआधी तुमचा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. गुलाब पाण्याने चेहऱ्यावर मसाज केल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो.

▪ *स्क्रबिंग* : आपल्या स्किन टाइपनुसार, स्क्रबची निवड करा. स्क्रब करताना हातांना चेहऱ्यावर सर्क्युलर मोशनमध्ये फिरवा. ही स्क्रब करण्याची योग्य पद्धत आहे. स्क्रब केल्यानंतर स्किन टाइपनुसार, फेस पॅक लावा आणि 10 मिनिट ठेवल्यानंतर साध्या पाण्याने धुवून टाका. सकाळ उठल्यानंतर तुम्हाला चेहऱ्यावर ग्लो दिसून येईल.

▪ *मुलतानी माती* : जर तुमची स्किन ऑयली असेल तर चेहऱ्यावर मुलतानी माती लावा व 10 ते 15 मिनिटनंतर चेहरा धुवून टाका. मुलतानी माती लावल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होतात आणि फ्रेश लूक मिळण्यासही मदत होते.

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?

लेख: आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.