निगेटिव्ह थॉट्सला दूर करायचंय..?
👉 निगेटिव्ह थॉट्सला दूर करायचंय..?
‘आयुष्यात पॉझिटिव्ह रहावं’ असे सल्ले देणारे दिवसभरात कितीतरी जण भेटतात. मात्र आयुष्यातून काही केल्या निगेटिव्ह थॉट्स दूर होत नाही अशी अनेकांची ओरड असते. त्यांची ही ओरड साहजिकच आहे. कारण आयुष्यात जे आपण ठरवू तसे होईलच असे नसते. जे आहे ते स्विकारण्याची तयारी असायली हवी. पण आपलं याच्या उलट असतं. एखादी गोष्ट करण्याआधी ती होणार नाही, ती मी करू शकत नाही, मला जमणार नाही याची चिंताच आपल्याला खायला उठते. अशात यांपासून सूटका मिळवणे कठिणच होऊन बसते.
लक्षात घ्या, रस्त्यावर खूप सारे दगडं असतील तर तुम्ही चांगले बुट घालून त्याच्यावर चालू शकता. मात्र जर तुमच्या बुटामध्ये एखादा छोटासा दगडं जरी घुसला तरी चालणे अवघड होऊन बसते. अगदी असंच आहे आपल्या लाईफचं. बाहेरील अडचणींपेक्षा आपण आंतरिक अडचणींनेच जास्त खचतो. ज्याचं कारण असतं आपले निगेटिव्ह थॉट्स. म्हणूनच अशा निगेटिव्ह थॉट्सला दूर करण्याची सोपी ट्रिक आज जाणून घेऊयात...
1) एक छोटी डायरी नेहमी तुमच्या सोबत ठेवा. त्यात छोटे-छोटे बॉक्स बनवा.
2) जेव्हा पण तुम्ही ’नाही’ या शब्दाचा वापर कराल. त्यावेळी डायरीतील बॉक्समध्ये एक टिक करा.
3) दिवसभरातील कोणत्याही कामादरम्यान ’नाही’ चा वापर केला तरी बॉक्समध्ये एक टिक करा.
4) जर तुम्ही डायरीमध्ये टिक करण्याचे विसरला तर डायरी बंद करून ठेवून देऊ नका. तर जे मोकळं राहील ते सोडून द्या. त्याकडे न पाहता पुन्हा टिक करणे नव्याने सुरु करा.
5) त्यानंतर दिवसातील एक वेळ निश्चित करा. ज्यावेळी तुम्हाला दिवसभरातील ’नाही’ चा हिशोब करायचा आहे
6) दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी पेक्षा ’नाही’ चा वापर कमी करण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला हे अवघड वाटत असले तरी हळू-हळू यात यश मिळते. त्यामुळे प्रयत्न करत रहा
वरील ट्रिकसाठी तुम्ही डायरी व्यतिरिक्त इतर गोष्टींचा देखील वापर करू शकता. जे तुम्हाला सोईस्कर असेल ते. खरंच हि छोटीशी ट्रिक तुम्हाला आयुष्यात नक्कीच फायदेशीर ठरेल, ट्राय करून पहा.
Comments
Post a Comment