गृहिणींसाठी आवश्यक बाबी...

👉 गृहिणींसाठी आवश्यक बाबी...

आपलं जीवन सुखी आणि आनंदी असावं यासाठी आपली अहोरात्र धावपळ सुरू असते. त्यातल्या त्यात महिलांना भलतीच तारेवरची कसरत करावी लागते. घरादारातील कामे, नोकरीची धावपळ, बालसंगोपन, वृध्दांची देखभाल, मुलांच्या परीक्षा, पाहुणे, अशा अनेक आघाड्यांवर लढणाऱ्या महिलांना बरेचदा आनंद उपभोगणे कामाच्या ओझ्यापुढे आणि दैनंदिन अडचणींमुळे शक्य होत नाही. मग त्यांची चिड-चिड सुरू होते आणि पर्यायाने घरातील शांतता समाधान कुठेतरी हरवू लागते. असं होवू नये म्हणून खास गृहिणींसाठी आवश्यक बाबी जाणून घेऊयात...

1) दृष्टीकोन बदला : कोणताही विचार सकारात्मक दृष्टीकोनातून करायला हवा. कारण जीवनात काहीच अशक्य नाही. गरज असते पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करण्याची. अशा वेळी सकारात्मक विचार तुम्हाला वेगळाच आत्मविश्वास देतो आणि त्याचा तुमच्या आरोग्यावरही अनुकुल परिणाम होतो.

2) वर्तमानाचा विचार करा : आयुष्य जगताना त्रासदायक जुन्या घटना पुन्हा-पुन्हा उगाळू नका तर वर्तमानाचा विचार करा. जुनेच उगाळत राहिलात तर वर्तमानातला आनंद लुटणे अवघड होते हे लक्षात ठेवा.

3) आनंद मिळतो, तेथे जा : जेथे भेट दिल्याने जिवाला गारवा मिळतो, आनंद मिळतो व एकप्रकारची शांतता तनामनात भिनते अशा ठिकाणी आवर्जून भेट द्या. ज्या ठिकाणी तुमच्या दुःखाशी निगडीत स्मृती आहेत तेथे जाणे शक्यतो टाळा.

4) संगीत ऐका : बाहेर जाणे शक्य नाही आणि उदासी दाटून आलीय अशा वेळी किंवा बोअर होत असेल तर आवडती गाणी, संगीत ऐका.

5) हसतमुख रहा : कुणाला नाराज करायला एक मिनिटही पुरेसा असतो. मात्र हसवायला तासन् तास वेळ जातो. त्यामुळे आनंदी राहण्यासाठी स्वतः हसा, दुसऱ्यांनाही हसण्याची संधी द्या.

6) आहाराकडे लक्ष द्या : जे तुम्ही खाता, त्याचा परिणाम तुमचा चेहरा आणि शरीरावर उमटत असतो. तेव्हा खाण्याकडे लक्ष द्या, सीझनप्रमाणे मिळणाऱ्या सर्व भाज्या, फळे आवर्जून खाच. यामुळे तुमचे शरीर फिट राहण्यास मदत मिळते आणि स्वास्थ मिळाले की आनंद त्यापाठोपाठ येतोच.

7) पुरेशी झोप घ्या : डोक्यात सतत काही ना काही विचार चालू असले की झोपेचे खोबरे होते हा अनुभव सर्वांनाच असतो. मात्र झोपेच्या वेळी पूर्ण लक्ष झोपेकडेच केंद्रीत ठेवा. विचार करायला सगळा दिवस पडलाय असे मनाला समजवा आणि पुरेशी झोप व विश्रांती मिळेल यासाठी प्रयत्न करा. झोप आणि विश्रांती पुरेशी झाली की चेहरा आपोआपच फ्रेश होतो.

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?

लेख: आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.