श्रीमंत होण्यासाठी काय महत्वाचं?

👉 श्रीमंत होण्यासाठी काय महत्वाचं?

श्रीमंतांची संपत्ती दिवसेंदिवस वाढत असते. त्याप्रमाणात सर्वसामान्याची संपत्ती वाढत नाही. श्रीमंतांची संपत्ती नेहमी वाढतच का जाते आणि आपली का वाढत नाही हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर असतो. यामागे एकमेव कारण म्हणजे आपण पैशाकडे कशा पद्धतीने पाहतो. यात सर्वात महत्वाचं म्हणजे पैसे आल्यावर सर्वसामान्य ऐशो आरामाच्या गोष्टीत खर्च करतात. मात्र श्रीमंत लोक त्या पैशाचे अजून जास्त पैसे कसे वाढतील हे पाहतात. म्हणूनच श्रीमंत होण्यासाठी कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत त्यावर एक नजर...

👉 योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट

सर्वसामान्य लोक पैसे गुंतवताना केवळ कॅपिटल सुरक्षित राहावे याचा विचार करतात. मात्र श्रीमंत लोक पैसे अशा ठिकाणी गुंतवतात जेथून त्यांना जास्त रिटर्न मिळू शकतात. त्यासाठी ते मार्केटवर लक्ष ठेऊन असतात. त्याची तंतोतंत माहिती मिळवतात. बारीक सारीक गोष्टी माहिती केल्यानंतर डिसिजन घेतात. म्हणून पैसे वाढवण्यासाठी योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करणे आवश्यक असते.

👉 चांगल्या रिटर्नसाठी पेशन्स ठेवतात

श्रीमंत लोक एकाच ठिकाणी संपूर्ण फंड इन्व्हेस्ट करत नाहीत. वेगवेगळ्या गुंतवणुकीतून मोठा रिटर्न मिळवतात. त्यासाठी ते पेशन्स ठेवतात घाईगडबडीत निर्णय घेत नाहीत. गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती यासाठी ते अभ्यास करतात. यामुळे त्यांच्या पैशात वाढ होते.

👉 हायर रिस्क आणि हायर रिटर्न

रिस्क घेतली नाही तर रिटर्न जास्त भेटत नाहीत म्हणून हायर रिटर्न आणि हायर रिस्क याचा जवळचा संबंध आहे. श्रीमंत लोक रिस्क घेतात, पण त्यापूर्वी त्याचा
पूर्ण सखोल अभ्यास करतात. म्हणूनच त्यांना चांगले रिटर्न मिळतात.

👉 एका पेक्षा जास्त ठिकाणी पैसे गुंतवतात

श्रीमंत लोक अनेक ठिकाणी पैसे गुंतवतात ते त्यांना शक्य असते असा आपला समज असतो. मात्र त्यांची सुरुवात लहान-लहान कामातून किंवा गुंतवणुकीतून झालेली असते. त्याच प्रमाणे आपणही लहान-लहान प्रमाणात ठिकठिकाणी पैसे गुंतवू शकतो.

👉 अनुभवाचा फायदा करून घेतात

सर्वसामान्य नागरिक कधी तरी पैसे गुंतवतात. त्यांना याचा अनुभव नसतो. अशा वेळी त्यांना जास्त रिटर्न मिळत नाही. मात्र श्रीमंत लोकांना पैैसे गुंतवण्यासाठीचा प्रदीर्घ अनुभव असतो. त्यातून ते नवनवीन स्कील डेव्हलप करतात ज्याचा फायदा रिटर्न भेटण्यासाठी होतो.

संकलन :- स्वप्निल भिवाजी आव्हाड, सिन्नर.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?