๐ฅต เคเคจ्เคนाเคณ्เคฏाเคค เคซिเค เคฐाเคนाเคฏเคเคฏं?; 'เคฏा' เคिเคช्เคธ เค्เคฐाเคฏ เคเคฐा
🥵 उन्हाळ्यात फिट राहायचयं?; 'या' टिप्स ट्राय करा
💁♂उन्हाळा आपल्यासोबत अनेक आजार घेऊन येतो. सूर्याचं प्रखर ऊन आणि वातावरणातील प्रचंड उकाडा यांमुळे शरीरावर अनेक विपरित परिणाम होतात. पचनसंस्था आणि त्वचेसंबंधातील समस्यांसोबत वायरल फिवर, सन स्ट्रोक आणि इन्फेक्शनचाही धोका वाढतो. अशातच काही खास टिप्स वापरून तुम्ही आजारांपासून स्वतःला दूर ठेवू शकता.
▪जर तुमचं शरीर हायड्रेट असेल तर तुम्ही 90 टक्के आजारांपासून स्वतःच रक्षण करू शकता. पाण्याला शरीराद्वारे आपल्या कोलोनमध्ये शोषून घेण्यात येतं. यामुळे पचनसंस्था सुरळीत होण्यास मदत होते. उन्हाळ्यामध्ये जास्त तहान लागते आणि नको असलेले पदार्थ शरीरातून घामावाटे बाहेर टाकण्यात येतात. त्यासाठी शरीर हायड्रेट ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. त्यासाठी भरपूर पाणी पिणं तसचे आहारामध्ये वॉटर इन्टेक असलेल्या पदार्थांचा समावेश करणं गरजेचं असतं.
▪धान्य, भाज्या, फळं आणि फळभाज्या यांमध्ये मुबलक प्रमाणात फायबर आढळून येतं. यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते आणि बद्दकोष्टसारख्या पोटाच्या समस्या दूर राहतात.
▪उन्हाळ्यामध्ये कॅफेनचं सेवनही पचनक्रियेवर परिणाम करतं. यामुळे अल्सर, अॅसिडिटी आणि जळजळ यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. उन्हाळ्यामध्ये चहा-कॉफीचं सेवन कमी करा आणि शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थांच सेवन जास्त करा. त्यासाठी तुम्ही दही, ताक, ज्यूस यांसारख्या थंड पदार्थांचा समावेश करू शकता.
▪घाम येणं हे आरोग्यासाठी उत्तम समजलं जातं. कारण यामुळे शरीरातील विषारी घटक, घाण शरीराबाहेर टाकण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर शरीराला फिट आणि निरोगी ठेवण्यासाठी मदत करतो. अशातच शरीर सक्रिय ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे फिट आणि हेल्दी राहण्यास मदत होते.
▪शक्य असेल तर उन्हामध्ये जास्त राहू नका. वातारणातील उकाडा वाढलेला असतो. ज्यामुळे चक्कर येणं आणि डोकेदुखी यांसारख्या गोष्टींचा धोका वाढतो. याव्यतिरिक्त उन्हाळ्यामध्ये हलक्या रंगाचे कपडे वेअर करा.
▪उन्हाळ्यामध्ये इतर समस्यांचाही सामना करावा लागत. उदाहर्णार्थ, काविळ, टायफॉइड आणि फूड पॉइझनिंग इत्यादी. त्यामुळे अशावेळी तुम्ही तुमच्या आहाराबाबत जागरूक असणं गरजेचं असतं. शक्यतो बाहेरील अन्नपदार्थ खाणं टाळा. तसेच शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा.
💥
Comments
Post a Comment