एकक म्हणजे म्हणजे काय? जाणून घ्या महत्वाची एकके

🤨 एकक म्हणजे म्हणजे काय? जाणून घ्या महत्वाची एकके

एकक म्हणजे आकार, वस्तुमान, अंतर इत्यादी मोजण्याचे परिमाण. दैनंदिन वापरात अनेक एकके असतात. जसे कि, वजन मोजण्यासाठी वापरात असलेले किलोग्रॅम. अंतर मोजण्यासाठी नॅनोमीटर ते किलोमीटर वगैरे. आज अशाच काही एककांबद्दल जाणून घेऊयात...  

📍 एकके ही दोन प्रकारची असतात :

1) मूलभूत एकक ( Fundamental unit) : ज्या भौतिक राशीचे एकक हे दुसय्रा राशीवर अवलंबून नसते त्याना मूलभूत एकक म्हणतात. जसे : मीटर, किलोग्राम, सेकंद, केल्व्हिन, मोल

2) साध्य एकक (Derived quantity/Unit) : ज्या राशी/एकके या मूलभूत राशीच्या मदतीने तयार होतात त्यांना साध्य राशी/एकके म्हणतात.

💁‍♂ जाणून घ्या महत्वाची एकके :

▪ एकर : जमिनीचे मोजमाप करण्याचे एकक
▪ मैल : अंतर मोजण्याचे एकक
▪ हर्टझ : विद्युत चुंबकीय लहरी मोजण्याचे एकक
▪ वॅट : शक्तीचे एकक
▪ पौंड : वजन मोजण्याचे एकक
▪ कॅलरी : उष्णता मोजण्याचे एकक
▪ मीटर : अंतर मोजण्याचे एकक
▪ किलोग्रॅम : वजन मोजण्याचे एकक
▪ सेकंद : वेळ मोजण्याचे एकक
▪ अँपिअर : वीजप्रवाह मोजण्याचे एकक
▪ केल्विन : तापमान मोजण्याचे एकक
▪ मोल : पदार्थांचे प्रमाण मोजण्याचे एकक
▪ कँडेला : प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे एकक
▪ नॉट : सागरी जहाजांची गती मोजण्याचे एकक
▪ फॅदम : समुद्राची खोली मोजण्याचे एकक
▪ बार :  वायुदाब मोजण्याचे एकक
▪ मायक्रोन : लांबीचे वैज्ञानिक एकक
▪ हँड : घोड्याची उंची मोजण्याचे एकक
▪ गाठ : कापूस गाठी मोजण्याचे एकक
▪ रोएंटजेनक्ष : किरणांनी उत्पन्न केलेली विकिरण मात्रा मोजण्याचे
▪ दस्ता : कागदसंख्या मोजण्याचे एकक
▪ हॉर्स : पॉवरस्वयंचलित वाहन किंवा यंत्राची भर उचलण्याची शक्ती मोजण्याचे एकक

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?