कोंब आलेले बटाटे आरोग्यासाठी हानीकारक, अहवालात काय म्हटलंय.?

🥔 कोंब आलेले बटाटे आरोग्यासाठी हानीकारक, अहवालात काय म्हटलंय.?

🍽️ स्वयंपाकघरात सर्वाधिक वापरली जाणारी फळभाजी म्हणजे, बटाटा.. घरात अनेकदा मोठ्या प्रमाणात बटाटे ठेवले जातात. मात्र, काही दिवस त्यांचा वापर न केल्यास, बटाट्यांना कोंब फुटतात. असे बटाटे आरोग्यासाठी फार हानीकारक असल्याचे 'नॅशनल कॅपिटल पॉयझन सेंटर'च्या अहवालात म्हटले आहे.

🌱 कोंब फुटलेले बटाटा आरोग्यासाठी कसा हानिकारक आहे, त्याचे परिणाम कसे समजून घ्यावे, त्यासाठी काय काळजी घ्यायला हवी, याबाबत जाणून घेऊ या..

☠️ बटाट्यांमध्ये नैसर्गिकरित्या 'सोलेनिन' व 'चाकोनाइन' हे विषारी गुणधर्म असणारे घटक असतात. बटाट्यात त्याचे प्रमाण कमी असले, तरी बटाट्याच्या पानांमध्ये हे गुणधर्म अधिक आढळतात. त्यामुळे बटाट्याला कोंब फुटू लागले, की या दोन्ही विषारी घटकांचे प्रमाणही वाढते. असे बटाटे खाण्यात आल्यास शरीरासाठी ते धोकेदायक ठरू शकते..

🙇🏻‍♀️ असे बटाटे खाल्ल्यास..
▪️ बटाट्यातील विषारी घटक शरीरात जास्त प्रमाणात गेल्यास उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. काहींना सौम्य प्रमाणात, काहींमध्ये ही लक्षणे गंभीर स्वरूपात असतात.
▪️ लक्षणे अधिक गंभीर असल्यास, कमी रक्तदाब, ताप नि डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

💁🏻‍♂️ कोंब न येण्यासाठी हे करा
▪️ बटाट्याला हिरवा रंग येत असेल किंवा आधीच कोंब फुटलेला असेल, तर तो काढून टाका.
▪️ सूर्यप्रकाश पोहोचत नाही, अशा ठिकाणी बटाटे ठेवा. कांद्यापासून ते नेहमी वेगळे ठेवा, कारण कांद्यातून निघणाऱ्या गॅसमुळे बटाट्यांना कोंब येऊ शकतात.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?