महाराष्ट्रातील या काही ठिकाणी पावसाळ्यात एकदातरी भेट द्या...

💁‍♂ महाराष्ट्रातील या काही ठिकाणी पावसाळ्यात एकदातरी भेट द्या...

👍 बर्‍याच प्रतीक्षेनंतर पावसाने आता जोमदार हजेरी लावलीय. म्हणूनच आज आम्ही घेऊन आलो आहोत महाराष्ट्रातील काही मनमोहक डेस्टीनेशन्स जी तुम्ही पावसाळ्यात पाहायलाच हवीत...

लोणावळा / खंडाळा : सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावर हे थंड हवेचं ठिकाण आहे. इथे असलेली विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दर्‍या, पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारं काही मनाला खूपखूप सुखद वाटते. याठिकाणी राजमाची पॉइंट, वळवण धरण, भुशी धरण, टायगर्स लीप, ड्यूक्स अँड डचेस नोज, कार्ला-भाजा येथील लेणी, लोहगड, विसापूर ही त्यापैकी काही ठळक ठिकाणे आहेत.

ताम्हिणी घाट : जर तुम्हाला निसर्ग आणि साहसी पर्यटन हे दोन्ही आवडतं.. तर इथे तुम्ही जायलाच हवं. येथील खोल हिरव्या दऱ्या, मुळशी धरण, कडेलोटावरुन पडणारे छोटेमोठे धबधबे तुम्हाला आकर्षित करतील.

भीमाशंकर : भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ठिकाण असून भिमा नदीचे उगमस्थान इथेच आहे. येथील गुप्त भीमाशंकर, कोकणकडा, सितारामबाबा आश्रम, नागफणी इ. ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.

सापुतारा : हे ठिकाण महाराष्ट्र - गुजरात सीमेवर आहे. हे एक थंड हवेचे ठिकाण असून सातपुडा पर्वतराजीत वसलेलं आहे. इथे पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळे म्हणजे हथगढ किल्ला, कलाकारांचे खेडे (आर्टीस्टस् व्हिलेज), मध संकलन केंद्र, गीरा धबधबा, रोप-वे, बोटींग क्लब, म्युझियम (संग्रहालय), सनराइज पॉईंट, सनसेट पॉईंट, इको पॉईंट, अ‍ॅक्वारियम इ.

इगतपुरी : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. या परिसरातील धबधबे पावसाळ्यात पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. इगतपुरी गावाच्या बाहेर डोंगराच्या पायथ्याशी धम्मगिरी हे विप्पश्यना केंद्र आहे. साधना करण्यासाठी देशातील निरनिराळ्या भागातून, परदेशांतूनही अनेक लोक येथे येतात.

पाचगणी : पाचगणी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. पाच डोंगराच्या समूहावर हे ठिकाण विकसित झालेलं असल्याने त्यास पाचगणी नाव पडले असावे. उत्कृष्ट हवामान आणि संपन्न निसर्ग हे पाचगणीचं स्वतःचं असं वैशिष्ट्य आहे. खोल दऱ्या, धबधबे, कमलगड, टेबल लँड, किडीज पार्क, पाचगणीच्या गुंफा ही काही प्रसिद्ध व पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळं आहेत.

माथेरान : रायगड जिल्ह्‍यातील एक थंड हवेचे ठिकाण तसेच निसर्गसौंदर्याने नटलेली जागा म्हणजे माथेरान. साधारण 2600 फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसले आहे. शार्लोट लेक, पॅनारोमा पॉईंट, लुईझा पॉईंट, सनसेट पॉईंट, वन ट्री हिल पॉईंट अशी अनेक पॉईंट इथे मनाला भुरळ घालतात.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?