रिकाम्या पोटी फळं खाणं शरीरासाठी हानिकारक असतं? 🤔

रिकाम्या पोटी फळं खाणं शरीरासाठी हानिकारक असतं? 🤔

🍎फळांचं जर रिकाम्यापोटी सेवन केलं तर तुम्हाला  पित्ताचा त्रास होऊ शकतो, असा काहींचा समज आहे. तर काही लोकांना वाटतं की रिकाम्या पोटी फळं खाणं हा आहारातील उत्तम पर्याय आहे. काय आहे फायदेशीर? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.

🍉खरंतर फळं खाण्यासाठी कुठलीच वेळ चांगली किंवा वाईट नसते. फळांमध्ये पोषक तत्त्वं असतात. तुम्ही कोणत्याही वेळी फळांचं सेवन करू शकता. रिकाम्या पोटी फळं खाणं शरीरासाठी चांगलं असतं.

🥭नाश्त्यानंतर किंवा मधल्या वेळात फळ खाणं पचनाच्या दृष्टीनं फायदेशीर आहे. ज्यांची पचनशक्ती चांगली आहे ते कोणत्याही वेळी फळं खाऊ शकतात.

🍍जेवणानंतर तुम्ही फळं खाल्लीत तर पचायला जड असतात. त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही. कदाचित तुम्हाला सुस्ती आल्यासारखं होऊ शकतं, असं एका संशोधनातून समोर आलं आहे.

🍇ज्या व्यक्तींना पित्ताचा आणि सर्दीचा त्रास आहे, अशा व्यक्तींनी मात्र रिकाम्या पोटी फलाहार घेणं टाळावं. मात्र फळं कुठल्याही वेळी तुम्ही खाऊ शकता. त्यासाठी कोणतीही निश्चित वेळ नसते.

🍊तुमच्या आहारात फळांचा किंवा फळांच्या रसाचा अधिक समावेश करा. ज्यामुळे तुम्हाला अधिक ऊर्जा आणि जीवनसत्त्वं मिळतील.

Comments

Popular posts from this blog

लेख: आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.