๐เคเคฐोเค्เคฏ เคเคค्เคคเคฎ เค ेเคตเคฃ्เคฏाเคธाเค ी เคนे เคเคฐूเคจ เคชाเคนा!
👌आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी हे करून पाहा!
👉आवळ्याचा चमचाभर रस, जिरे व खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ, संध्याकाळ दोन-तीन दिवस घेतल्यास आम्लपित्त कमी होते. पित्तामुळे भोवळे येणे कमी होते. लघवीच्या विकारांवर हे परिणामकारक औषध आहे.
👉आवळ्यापासून तयार केलेला मोरावळा हा तर पित्तावर उत्तम आहे. रोज परसाकडे साफ होत नाही, पोट जड वाटते, भूक लागत नाही, मन प्रसन्न राहत नाही, आजारी असल्यासारखे वाटते अशा तक्रारींवर मोरावळा रामबाण आहे.
👉आहार हेच औषध आहे, स्वस्थ जेवणानेच आरोग्य ठणठणीत होते, यासाठी पोषक आहार घ्यावा. नियमित पोषक आहार घेणे गरजेचे आहे. यामुळे शरीराची चांगली वाढ होऊन तंदुरुस्ती प्रदान होते.
👉आहारात कडधान्ये, पालेभाज्या, फळे भरपूर घ्या. गव्हाचा आटा वापरा, बटाटे सालीसकट खा, भरपूर द्रव्यपदार्थ घ्या. संपूर्ण व सकस आहार शरीरास आवश्यक असते. नाहीतर शरीरात पोषक द्रव्यांची कमी येते.
👉आहारात हिरव्या भाज्या, ब्रेड, तांदूळ, दूध, दही, मांस, अंडी, मासळी, फळे या पदार्थांचे सेवन करा. यामुळे शरीरास लागणारे व्हिटॅमिन मिळते. शरीरास व्हिटॅमिन आवश्यक असते. योग्य समतोल आहार घ्यावा.
Comments
Post a Comment