๐ ♂ "เคจाเคนी" เคฎ्เคนเคฃाเคฏเค्เคฏा เคाเคนी เคाเคธ เคชเคฆ्เคงเคคी
🙅♂ "नाही" म्हणायच्या काही खास पद्धती
अनेकदा "नाही" कसं म्हणावं या संकोचामुळे आपण बळजबरीने आपल्याच मनाला मारत "हो" बोलून टाकतो. कदाचित नंतर पश्चाताप देखील होतो. मग अशात प्रश्न पडतो "नाही" म्हणायचं तरी कसं? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे 'नाही' म्हणा पण अतिशय नम्रपणे. "नाही" म्हणायच्या खालील काही खास पद्धती वापरून तुम्ही "नाही" बोलू शकता...
▪ "मला मदत करायला खुपच आवडले असते. पण मी बांधील असलेल्या इतर काही कामांमुळे तुमचे काम मला योग्य वेळेत पूर्ण करणे शक्य होणार नाही..."
▪ "क्षमा करा पण सध्या मी जरा व्यस्त असल्याने मला तुमच्या कामासाठी ही वेळ योग्य वाटत नाही. पुढील महिन्यात केले तर नाही का चालणार? "
▪ "तुमची योजना खरंच चांगली आहे. पण तरीही मला विचार करायला काही अवधी लागेल. मी तुम्हाला अमुक एक दिवसांनंतर संपर्क केला तर चालेल का?"
▪ 'अमुक-अमुक' कारणामुळे मला ताबडतोब निर्णय देणे शक्य नाही. तरीही कृपया मला विचार करायला जरा वेळ द्याल का?"
▪ "मला असे वाटते की 'अमुक-अमुक' कारणामुळे मी यासाठी योग्य व्यक्ती नाही. तुम्ही 'अमुक-अमुक' व्यक्तिशी का नाही बोलत?"
▪ माफ करा पण मला खर्च करणे शक्य नाही.
एवढं करूनही समोरची व्यक्ती फारच आग्रही असल्यास कोणतेही कारण देण्याच्या फंदात न पड़ता त्या व्यक्तिला स्पष्ट 'नाही' म्हणा. शेवटी एखादया कामाला 'हो' किंवा 'नाही' म्हणणे हे पूर्णतः वैयक्तिक इच्छेवर अवलंबून असते. त्यामुळे कोणाला काय वाटेल याचा फारसा विचार न करता अत्यंत नम्रपणे आणि आत्मविश्वासाने स्पष्ट बोलणे अधिक योग्य...
Comments
Post a Comment