'यांनी' नाकारली फेअरनेस क्रीमची जाहिरात

👉 'यांनी' नाकारली फेअरनेस क्रीमची जाहिरात

कोट्यावधींचे मानधन देणा-या फेअरनेस क्रीमची जाहिरात स्वीकारण्यासाठी बॉलीवूड सेलिब्रिटीमध्ये नेहमीच चढाओढ असते. अशी जाहिरात करावी की नाही, याबद्दल बॉलिवूडमध्ये मतमतांतरे आहेत. मात्र चित्रपटसृष्टीत काही सेलिब्रिटी असेही आहेत ज्यांनी फेअरनेस क्रीमच्या जाहिराती नाकारत करोडो रुपयांवर पाणी सोडले आहे. कोण आहेत ते सेलिब्रिटी त्यावर एक नजर टाकुयात...

👉 कंगना राणावत : बॉलिवूडची 'क्वीन' कंगना राणावतने फेअरनेस क्रीमची जाहिरात स्वीकारून समाजात चुकीचा संदेश पसरवायचा नाहीये, असे सांगत तीने जाहिरातीसाठी मिळालेली 2 कोटी रुपयांची ऑफर धुडकावली होती.

👉 रणबीर कपूर : बॉलिवूडचा चॉकलेट हिरो रणबीर कपूरने फेअरनेस प्रॉडक्टच्या उत्पादनांमुळे काही होत नाही, उलट वर्णभेदाच्या संकल्पना वाढीस लागतात, असे सांगत त्याने 9 कोटी रुपयांची जाहिरात नाकारली होती.

👉 स्वरा भास्कर : 'गोऱ्या रंगासाठी जो वेडेपणा सुरू आहे तो थांबवणे गरजेचे आहे. त्वचेच्या रंगाकडे पाहून सकारात्मक वा नकारात्मक मत बनवणं चुकीचं आहे'. अशा रोखठोक शब्दांत सुनावत अभिनेत्री स्वरा भास्करने फेअरनेस क्रीमची जाहिरात नाकारली होती.

👉 रणदीप हुडा : 'आपण इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झालो असलो तरी अद्यापही आपल्यावर त्यांचा प्रभाव कायम आहे. त्यामुळेच आपल्याला गोऱ्या रंगाचे आकर्षण वाटते. मला असं वाटतं की, भारत असा एकमेव देश आहे जो गोऱ्या रंगाच्या मागे वेडा आहे' असे रणदीप हुडाने म्हटले होते.

👉 कल्की कोचलिन : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात अभिनेत्री कल्की कोचलिननेही या विषयावर स्पष्ट शब्दांत मत मांडलं होतं. मलाही फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीची ऑफर मिळाली होती, पण मी ती ऑफर नाकारली.

👉 ऐश्वर्या राय-बच्चन : क्रीममुळे तुम्हाला गोरेपणा मिळेल या संदेशावर विश्वास नसल्याने मिस वर्ल्ड ऐश्वर्याने फेअरनेस क्रीमची जाहिरात नाकारली होती.

👉 उपेन पटेल : फेअरनेस क्रीमच्या जाहिराती या वर्णभेद व आत्मविश्वास कमी करणा-या आहेत. मी जसा आहे त्यावर माझे स्वत:चे खूप प्रेम आहे. असे सांगत उपेनने फेअरनेस क्रीमची जाहिरात करण्यास नकार दिला होता.

👉 चित्रगंदा सेन : ब्लॅक ब्युटी चित्रगंदानेसुद्धा फेअरनेस क्रीमची जाहिरात करायला नकार दिला होता.

या व्यतिरिक्त अक्षय कुमार, ईशा गुप्ता, अनुष्का शर्मा, बिपाशा बासू यांनीसुद्धा फेअरनेस क्रीमच्या जाहिराती करण्यास नकार दिला होता.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?