मोगरा लागवड

मोगरा लागवड

  जमीन :

मोगरा सर्व प्रकारच्या जमिनीत येत असला तरी मोगऱ्याला मध्यम खोलीची व भुरकट रंगाची, चुनखडी नसलेली जमीन योग्य ठरते. जमिन चांगली निचरा होणारी असावी. निचरा न झाल्यास मोगऱ्याची पाने पावसाळ्यात पिवळी पडतात.

👉 पुर्वमशागत :

जमीन डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये 25 ते 30 सेंमी खोल नांगरून घ्यावी. 2-3 फुळवाच्या पाळ्या घालून सपाट करावी. नंतर 5 x 5 फुट अंतरावर 1 x 1 x 1 फुट आकारचे खड्डे खोदावेत.

👉 खड्डा कसा भरावा :

खड्डा भरताना प्रथम तळाशी वाळलेले गवत. काडी कचरा सहा इंच उंचीपर्यंत भरावा व नंतर एक घमेले पुर्ण कुजलेले शेणखत किंवा एक ओंजळभर गांडूळ खत व कल्पतरू 100 ग्रॅम टाकून मातीने खड्डा भरून घ्यावा.

👉 हवामान :

मोगरा साधारणत: स्वच्छ हवामानात चांगल्या प्रकारे येतो. अतिशय थंडी चालत नाही. मोगऱ्याची चांगली वाढ होण्यास 25 ते 35 डिग्री से. तापमान योग्य ठरते. अशा हवामानात कळ्या भरपूर लागून उत्पन्न वाढते.

👉 मोगरा लागवडीचा काळ :

मोगऱ्याची लागवड जूनचा पहिला पाऊस पडून गेल्यानंतर करावी. मोगऱ्याची लागवड शक्यतो पिशवीतील रोपे लावून करावी. त्यामुळे दीड ते दोन महिने रोपे नर्सरीत वाढतात व मर टळली जाते.

🎯 मोगऱ्याच्या जाती :

👉 मोतीचा बेला : कळी गोलाकार असते आणि फुलात दुहेरी पाकळ्या गोलाकार असतात.

👉 बेला : या मोगऱ्याच्या जातीला तामिळ भोषेत 'गुडूमल्ली' म्हणतात. फुलाला दुहेरी पाकळ्या असतात पण लांब नसतात.

👉 हजरा बेला : कानडी भाषेत 'सुजीमल्लीरो' म्हणतात. फुलात एकेरी पाकळ्या असतात.

👉 मुंग्ना : तामिळ भाषेत 'अड्डुकुमल्ली' व कानडीत 'एलुसूत्ते मल्लरी' म्हणतात. कळ्या आकाराने मोठ्या असतात. फुलात अनेक गोलाकार पाकळ्या असतात.

👉 शेतकरी मोगरा : ह्या मोगऱ्याला चांगल्या प्रतीच्या कळ्या येत असून हार व गजरे याकरीता वापरला जातो.

👉 बट मोगरा : ह्या मोगऱ्याच्या कळ्या आखुड असून कळ्या चांगल्या टणक फुगतात.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?