कॅलरी बर्न करून वजन कमी करण्याचा सोपा फंडा

🤩 कॅलरी बर्न करून वजन कमी करण्याचा सोपा फंडा

👉 वजन कमी करण्याचा विषय आला की, कॅलरी बर्न करा, कॅलरी बर्न करा, असाही एक नारा सतत ऐकायला मिळतो. पण अनेकांना कॅलरी बर्न कशा करायच्या याचा प्रश्न पडत असतो.

🧐 घरातील काम करून, खेळून, हसून तुम्ही कॅलरी बर्न करू शकता. कॅलरी बर्न करण्याच्या अजूनही काही गोष्टी आहेत, ज्या आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१. गाणी गा
गाणी गाऊन तुम्ही १० ते २० कॅलरी बर्न करू शकता. पण हे यावरही अवलंबून असतं की, गाताना तुम्ही किती उंच स्वरात गात आहात.

२. दिलखुलास हसा
जर तुम्ही केवळ १० मिनिटे दिलखुलास, मोकळेपणाने हसाल तर तुम्ही २० ते ४० कॅलरी बर्न करू शकता.

३. आरामात करा ब्रश
साधारण तीन मिनिटे ब्रश करूनही तुम्ही कॅलरी बर्न करू शकता. सोबतच तुमचे दातही अधिक स्वच्छ राहतील. त्यामुळे या घाईगडबडीत ब्रश करू नका.

४. पायी चाला
पायी चालूनही तुम्ही ५०० ते ६०० कॅलरी बर्न करता येऊ शकतात. तसेच पायी चालण्याने तुमचं हृदयही निरोगी राहण्यास मदत मिळते.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?