ЁЯдФ рдлрдЯाрдХे рд╡ाрдЬрд╡рддाрдиा рдХाрдп рдХाрд│рдЬी рдШ्рдпाрд╡ी?

🤔 फटाके वाजवताना काय काळजी घ्यावी?

▪ माेठ्या व्यक्तींच्या देखरेखीखाली अाणि घरापासून दूर माेकळ्या जागेत फटाके उडवावेत.
▪ फटाके उडवताना जवळच पाण्याची किंवा वाळूची बादली भरून ठेवावी.
▪ फटाके उडवताना आजूबाजूला कोणी प्राणी नाही ना याची खात्री करून घ्या, कारण प्राणी फटाक्यांना खूप घाबरतात.
▪ रॉकेटसारखे उंच उडणारे फटाके आणले असतील तर ते इमारतीच्या गच्चीत किंवा मैदानात अथवा मोकळ्या जागीच लावा. कारण रॉकेटसारखे फटाके पटकन कोणाच्याही घरात घुसतात.
▪ फटाके उडवायला जाताना लांब ओढणीचे, नायलॉनचे, सिल्कच्या झब्ब्यासारखे कपडे घालणं शक्यतो टाळाच. कारण फटाके उडताना एखादी ठिणगी जरी त्यावर पडली तरी त्यामुळे आपल्याला हानी होऊ शकते. शक्यतो सुती कपडे घालावेत.

💁‍♂ खास मोठ्यांसाठी काही सूचना

👉 तेलाचे दिवे मुलांचे हात पाेहोचू नये अशा आणि लाकडी सामान, पडदे व इतर ज्वलनशील वस्तू असणार नाहीत अशा ठिकाणी ठेवावेत.
👉 झाेपायच्या अाधी दिवे विझवण्याचे लक्षात ठेवा.
👉 नेहमी मेणबत्ती स्टँडचा वापर करा. मेणबत्ती बाटलीवर किंवा पुस्तकावर ठेवू नका.

🧐 फटाके उडवताना 'हे' करा

▪ हात ताठ सरळ ठेवून फटाके लावा. फटाका आणि तुमच्यातलं अंतर वाढेल.
▪ एखादा आग लागल्यासारखा अपघात झालाच तर प्रथम ती आग विझवा, जळालेले कपडे काढा. जखमीला ब्लॅंकेट किंवा बेडशीटमध्ये लपेटा.
▪ फटाके फोडायला जाताना चपला घालूनच जा.
▪ आल्यावर हात स्वच्छ साबणाने धुवा.

🧐 फटाके उडवताना 'हे' करू नका!

▪ फुलबाजा किंवा अन्य कोणताही फटाका जळत-जळत घरापर्यंत आणू नका.
▪ खिशात फटाके बाळगू नका.
▪ अर्धवट जळालेल्या फटाक्यांपासून नवीन फटाके तयार करू नका.          

🌐

Comments

Popular posts from this blog

рд╕рдорд░्рде рд░ाрдорджाрд╕ рд╕्рд╡ाрдоींрдЪी рдЕрддिрд╢рдп рд╕ुंрджрд░ рд░рдЪрдиा. рд╣ी реиреж рдХрдбрд╡ी рдо्рд╣рдгрдЬे реиреж рд░рдд्рдиे рдЖрд╣ेрдд.

рдоूрд▓рдЧीрдЪी рддрдХ्рд░ाрд░ - рдХрд╡िрддा

рд╢िрд╡рдЬрдпंрддी рддिрдеीрдк्рд░рдоाрдгे рдХा ?