या हॉस्पिटलमध्ये केला जातो हृदयविकाराचा मोफत इलाज. :-  ‘सत्य साई संजीवन हॉस्पिटल’, रायपुर- छत्तीसगड.

या हॉस्पिटलमध्ये केला जातो हृदयविकाराचा मोफत इलाज. :-  ‘सत्य साई संजीवन हॉस्पिटल’, रायपुर- छत्तीसगड.

आपण कधीही पण आजारी पडलो तर आपला संबंध हा हॉस्पिटलशी येतो. विविध आजारांनी त्रस्त झालेले रुग्ण,जीवन व मरण यातला सुरु असलेला त्यांचा संघर्ष अश्या एक ना अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. असे एक हॉस्पिटल आहे जिथे हृदयविकाराचा मोफत इलाज केला जातो.

हॉस्पिटल व्यवस्थापन कधीतर फक्त पैसे जमा नाहीत म्हणून रुग्णांवर इलाज करत नाहीत ज्यामुळे दगावलेले रुग्ण पण आपण बघितलेले आहेत. आपण कधीही पण आजारी पडलो तर आपला संबंध हा हॉस्पिटलशी येतो. विविध आजारांनी त्रस्त झालेले रुग्ण,जीवन व मरण यातला सुरु असलेला त्यांचा संघर्ष अश्या एक ना अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. सगळ्या प्रकारची रक्कम रुग्णांच्या नातेवाइकांकडून वसूल करून सुद्धा हॉस्पिटलमध्ये असलेल्या मूलभूत सोयी-सुविंधाचा अभाव. परंतु या सगळ्या गोष्टींना बगल देत अगदी वेगळ्या सिद्धांताच्या आधारावर एका हॉस्पिटलचा कारभार चालत आहे.त्याच हॉस्पिटलची गोष्ट आता आपण जाणून घेणार आहोत.

त्या हॉस्पिटलचं नाव आहे ‘सत्य साई संजीवन हॉस्पिटल’ जिथे हृदयविकाराचा मोफत इलाज केला जातो. छत्तीसगढ राज्याची राजधानी रायपूर मध्ये ३० एकराच्या परिसरात हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलच्या इमारतीचा आकार हा हृदयासारखा आहे. त्याच कारण सुद्धा तसच आहे कारण इथे फक्त लहान बाळ ज्याच्या हृदयामध्ये छिद्र आहे  अश्याच लहान मुलांच्या हृदयविकाराचा मोफत इलाज केला जातो. नुसतंच उपचार नाही तर त्यासाठी लागणार औषधींचा खर्च,लहान बाळाच्या आई वडीलांची राहण्याची व जेवणाची सोय किंवा जर त्या बाळावर शस्त्रक्रिया करायची झाल्यास त्यासाठी कोणत्याही प्रकारचा खर्च किंवा शुल्क हॉस्पिटल व्यवस्थापन आकारात नाही.बाहेर ठिकाणी याच गोष्टींचा खर्च हा किमान पाच ते सहा लाखाच्या घरात आहे.

नियतीने जन्म देताच मृत्यूच्या दारात सुद्धा आणून ठेवलं परंतु अश्या बाळांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी सत्य साई संजीवन हॉस्पिटल एक आशेचा किरण आहे.इथे उपचार घेणारे सर्वच कुटुंब हे शेतकरी, गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत.इथे येताना बाळाला अतिशय दुःखात आणल्या जाते परंतु जाताना अतिशय आनंदी वातावरणात त्याला पाठवल्या जाते.इथे फक्त भारतामधील नाही तर बाहेर देशांमधून सुद्धा बरेच लोक उपचारासाठी येत असतात.ज्यामध्ये पाकिस्तान,श्रीलंका अफगाणिस्तान,नायजेरिया,नेपाल आणि बांगलादेश यांचा मुख्यतः समावेश आहे.

भारत आणि पाकिस्तान यांचे सध्याचे संबंध ताणलेले असून सुद्धा कोणताही भेदभाव न करता इथे मुलांच्या हृदयविकाराचा मोफत इलाज केला जातो. शाबान अली पाकिस्तानच्या सिंध प्रांतांमधील एक लहान बाळ.तो एक वर्षापेक्षा कमी असताना डॉक्टर च्या लक्षात आल की त्याच्या हृदयामध्ये छिद्र आहे आणि शस्त्रक्रिया करूनच त्याचा इलाज होऊ शकतो.परंतु त्याचा खर्च झेपणारा नव्हता.परंतु त्यांचा संपूर्ण इलाज हा सत्य साई संजीवन हॉस्पिटल मध्ये झाला आणि आज शाबान हसत-हसत आपलं जीवन जगत आहे.

मागील चार वर्षांमध्ये ३००० पेक्षा जास्त बाळांचा उपचार तसेच त्यांचा संपूर्ण खर्च हा हॉस्पिटलने केला आहे.अश्या या हॉस्पिटलला आपण सलाम केला पाहिजे.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?