अबालवृध्दासाठी अतिउत्तम औषध; आवळा

👉 अबालवृध्दासाठी अतिउत्तम औषध; आवळा

आवळा हे एक औषधी फळ असून आयुर्वेदामध्ये आवळ्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. आवळा आपल्याला वर्षभर फळ तसेच औषध म्हणून वापरता येऊ शकते. हजार आजारावर आवळा हे एकच औषध असल्याने अबालवृध्दासाठी आवळा हे अतिउत्तम औषध आहे. अजून काय फायदे आहेत आवळ्याचे ते जाणून घेऊयात...

👉 रासायनिक विश्लेषणाच्या आधारे आवळा या फळात जितके 'सी' व्हिटॅमिन आढळते तितके अन्य कुठल्या फळात आढळत नाहीत. त्यामुळे व्हिटॅमिन 'सी' साठी आवळा फायदेशीर आहे.

👉 लोणचे, मुरंबा, ज्यूस, सुपारी, चूर्ण आदी तयार करून आपण त्याचा विविध प्रकारच्या आजारावर औषध म्हणून वापर करू शकतो.

👉 आवळा तूरट-आंबट असल्याने पित्त, कफ व जुलाब या आजारावर जालीम औषध आहे. त्यामुळे त्याला त्रिदोषनाशकही म्हटले जाते.

👉 आवळ्याच्या सेवनाने चेहरा तेजस्वी होतो व म्हतारपणा दूर ढकलण्यात मदत होते.

👉 आवळा हे फळ वीर्यवर्धक असल्याने वीर्यवृद्धीसाठी याचे सेवन केल्यास फायदेशीर आहे.

👉 आवळ्याच्या सेवनाने पचनक्रिया नियंत्रित राहून पचनास मदत होते.

👉 आवळा हे फळ ज्वरनाशक आहे.

👉 आवळ्याच्या सेवनाने स्नायू तसेच दात मजबूत होतात.

👉 आवळा हा डोळ्यांच्या विकारांसाठी फायदेशीर आहे त्यामुळे आपली नजर तेज होते.

👉 आवळा हे फळ केसांना काळेभोर व कोमल ठेवते.

👉 आवळा हे फळ हृदयरोग, मधुमेह, सर्दी, खोकला, स्वप्नदोष, श्वेत पदर आदी आजारावर गुणकारी आहे.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?