कमी पाण्यात करा फळबाग नियोजन

कमी पाण्यात करा फळबाग नियोजन

उन्हाळ्याची चाहूल लागली आहे तसेच काही ठिकाणी पाण्याचीही कमतरता जाणवू लागली आहे. त्यातच काही शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केलेली असल्याने चिंतेचे वातावरण आहे. पण काळजी करू नका कमी पाण्यातही फळबागेच तुम्ही नियोजन करू शकता. कसं ते पाहूया...

👉 पाणीटंचाईचा ताण कमी करण्यासाठी संरक्षित पाणी द्या, यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन, मडका पद्धत यांचा वापर करावा.

👉 पाण्याच्या उपलब्धतेनुसार फळझाडावर बहर घ्यावा.

👉 झाडे कोमेजल्यास अशावेळी 1% युरिया, 1% म्युरेट ऑफ पोटॅशचा फवारा पिकावर मारल्यास झाडांना अन्नपुरवठा थोड्या प्रमाणात होऊन झाडामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता येते.

👉 पाण्याच्या उपलब्धतेनुसार रासायनिक खताच्या मात्रा द्याव्यात.

👉 झाडावरील अनावश्यक फांद्या, पाने काढून कमीत कमी आवश्यक तेवढीच पाने व फांद्या ठेवाव्यात.

👉 झाडांचा आकार लहान असल्यास झाडावर कसतान अथवा गवताने सावली करावी. त्यामुळे झाडांचे तापमान वाढणार नाही व पानांद्वारे पाण्याचे बाष्पीभवन कमी होईल.

👉 फळबागेभोवती 6 ते 7 फूट उंचीचे बांबूच्या अथवा उसाचे पाचट अथवा गव्हाच्या काडापासून तयार केलेल्या चटया बांधून वारा प्रतिरोधक कुंपण करावे.

👉 जमिनीत पाणी धरून ठेवण्यासाठी आच्छादनापूर्वी खोडाभोवती चांगले कुजलेले सेंद्रिय खत मातीत मिसळावे.

👉 फळबागेमधील तण काढावे. आळ्यातील माती हलवून भुसभुशीत करावी. त्यामुळे शेतात पडलेल्या भेगा बुजवून केषाकर्षणाने खालच्या थरातील पाणी वर येणे थांबते.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

✍संकलन : स्वप्निल भिवाजी आव्हाड✍
:- शिवाजीनगर - माळवाडी. सिन्नर.
📱📞+९१७७०९७६१८५२

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?